डोक्यावर हेल्मेट नाही, हँडलवर हात न ठेवता तरुणीने सुसाट बाईक पळवली, धोकादायक स्टंटबाजीचा VIDEO व्हायरल

Young Woman Rides Bullet Hands-Free: इंदूरमधील तरुणीचा बुलेटवर स्टंट करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. व्हिडिओ व्हायरल होताच इंदूर पोलिसांकडून चौकशी सुरू.
Young Woman Rides Bullet Hands-Free
Young Woman Rides Bullet Hands-FreeSaam
Published On

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असताना इंदूरमधील एका तरूणीच्या व्हिडिओमुळे खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये तरूणीनं स्वत: च्या जीवाला धोका नाही तर, इतरांच्या जीवालाही धोका निर्माण केला असल्याचं दिसून येतंय. या व्हिडिओमध्ये एक तरूणी बाईकवर स्टंट करताना दिसून येत आहे. तसेच तिनं वाहतूक नियमांचे उल्लंघन करत अनेकांच्या जीवाला धोका निर्माण केलाय. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

सध्या सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, सांगता येत नाही. सोशल मीडियावर रील बनवण्यासाठी काही जण अनेपक्षित गोष्टी करतात. तर, काही जण अक्षरश: जीव धोक्यात घालतात. असाच एक व्हिडिओ इंदूरमधील तरूणीचा व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये तरूणी बुलेट चालवत आहे. बाईक चालवत असताना ती वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्याचं दिसून येत आहे.

Young Woman Rides Bullet Hands-Free
भाजप नेत्याच्या बेडरूमला आग, रॉकेट थेट बाल्कनीत घुसला; मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं अन्..

ही तरूणी हँडल न धरता बाईक चालवत आहे. ही तरूणी फक्त वाहतूक नियमांचे उल्लंघन करत नाही तर, स्वत:ची आणि इतरांची सुरक्षा देखील धोक्यात घालत आहे. तरूणीचा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. तसेच इंदूर पोलिसांच्या सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलनं कारवाई करत व्हिडिओची चौकशी सुरू केली आहे.

Young Woman Rides Bullet Hands-Free
तिशीतच हाडं ठिसूळ? गुडघे, सांधे ठणतात? खा घरगुती ४ पदार्थ, तज्ज्ञ सांगतात..

डीसीपी राजेश दंडोटिया म्हणाले की, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक मुलगी बाईकवरून स्टंट करत आहे. हेल्मेटशिवाय वाहतूक नियमांचे उल्लंघन देखील करत असल्याचं दिसून येत आहे. हा व्हिडिओ नेमकं कोणत्या भागात शूट करण्यात आला? ती तरूणी कोण? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. तरूणीची ओळख पटल्यानंतर तिच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com