LPG CYLINDER CRISIS: GOVT ISSUES NEW BOOKING RULES FOR URBAN AND RURAL CONSUMERS saam tv
देश विदेश

LPG Gas Cylinder Crisis: शहरात आणि ग्रामीण भागात किती दिवसांनी मिळेल गॅस सिलिंडर? सरकारनं दिली नवी अपडेट

LPG Supply Update: जागतिक तणावामुळे एलपीजीचा तुटवडा निर्माण होण्याची भीती असताना, सरकारने गॅस सिलिंडरच्या बुकिंगबाबत नवीन अपडेट दिली आहे. शहरी भागात आणि ग्रामीण भागात किती दिवसांनी एलपीजी सिलिंडर मिळेल याची माहिती हरदीप पुरी यांनी दिली आहे.

Bharat Jadhav

  • इराण-अमेरिका तणावामुळे एलपीजी पुरवठ्यावर परिणाम.

  • गॅस टंचाईच्या अफवांमुळे देशभरात नागरिकांमध्ये गोंधळ.

  • सरकारचा खुलासा: देशात एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध

इराण आणि अमेरिकेच्या युद्धाचा परिणाम क्रूड ऑइल आणि एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर पडलाय. पश्चिम-आशियामधील युद्धाचा परिणाम भारतातही जाणवत आहे. देशातील गॅस टंचाई निर्माण झाली असून अनेक ठिकाणी नागरिकांनी गॅस एजन्सीबाहेर रांगा लावल्या आहेत. त्याचदरम्यान सिलिंडरचा पुरवठा होणार नाही, आपल्याला गॅस सिलिंडर मिळणार नाही.

गॅसच्या किमती वाढतील अशा अफवा फसरत असल्याने राज्यासह देशभरातील नागरिकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्याचदरम्यान घरगुती सिलिंडर मिळण्याबाबत सरकारकडून नवी अपडेट देण्यात आली आहे. देशातील गॅस संकटाबाबत पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी संसदेत महत्त्वाची माहिती दिली आहे. देशात पुरेसे जेपीजी गॅस सिलिंडर आहेत आणि कोणीही घाबरून जाण्याची गरज नाही.

सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी पावले उचलण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत. ग्रामीण भागात ४५ दिवसांनी आणि शहरी भागात २५ दिवसांनी दुसरा एलपीजी सिलिंडर बुक करण्याची परवानगी असेल. "आधुनिक ऊर्जा इतिहासात जगाने असा काळ कधीही पाहिला नाही. भारताची कच्च्या तेलाची पुरवठ्याची परिस्थिती सुरक्षित आहे आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून मिळणाऱ्या तेलाच्या पुरवठ्यापेक्षा त्याचे प्रमाण जास्त आहे.

या तणावाच्या आधी भारतासुमारे ४५ टक्के कच्च्या तेलाची आयात होर्मुझच्या सामुद्रधुनीतून करत होता. दरम्यान पंतप्रधानांच्या उत्कृष्ट राजनैतिक संपर्क आणि विश्वासार्हतेमुळे भारत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तितकीच कच्च्या तेलाची आयात करत आहे, अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी लोकसभेत दिली.

देशात एलपीजीचा तुटवडा नाही: हरदीप पुरी

"रिफायनरीच्या सूचनांनुसार गेल्या पाच दिवसांत एलपीजी उत्पादनात २८ टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि पुढील खरेदी सुरू आहे. भारतातील ३३० दशलक्ष कुटुंबांची, विशेष म्हणजे गरीब आणि गरजू व्यक्तींची स्वयंपाकघरे कोणत्याही अन्नटंचाईपासून मुक्त असतील, ही मोदी सरकारची प्राथमिकता आहे. घरगुती पुरवठा पूर्णपणे सुरक्षित आहे आणि वितरण साखळीत कोणताही बदल करण्यात आला नाही असं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री देशातील एलपीजी संकटाबाबत म्हणाले.

अफवा पसरवण्याची ही वेळ नाही: हरदीप पुरी

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत एलपीजीचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी सांगितले की रेस्टॉरंट्स बंद पडत आहेत. एलपीजीबद्दल भीती पसरली आहे आणि लहान व्यवसायांवर परिणाम होतोय. यावर केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी उत्तर दिलंय, ही अफवा किंवा खोटेपणा पसरवण्याची वेळ नाही. भारत इतिहासातील सर्वात गंभीर जागतिक ऊर्जा व्यत्यय अनुभवत आहे. फळांचा पुरवठा केला जात आहे आणि घरे आणि शेतांसाठी गॅसला प्राधान्य दिले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाटील पिता-पुत्र खून खटल्यात कोर्टाचा निकाल, माजी नगराध्यक्ष पवारसह 11 जणांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: जागर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून धुळे - सोलापूर महामार्गावर टायर जाळून आंदोलन

Crime: किरकोळ वादातून भयंकर हत्याकांड, तलवारीने सपासप वार करत तरुणाने बायको अन् मुलाला संपवलं

महानगर गॅसच्या कार्यालयात गोंधळ; वाढीव बिलांवरून शरद पवार गट आक्रमक, अधिकाऱ्यांना दिला काळं फासण्याचा इशारा

रक्ताने माखले, स्ट्रेचरवरून खाली पडले; भाजपच्या महामंत्र्याचा जागेवर मृत्यू, राजकीय वर्तुळात हळहळ

SCROLL FOR NEXT