Lottery tycoon Santiago Martin’s family steps into Tamil Nadu politics with massive wealth and influence. saam tv
देश विदेश

लॉटरी किंगची राजकारणात एंट्री! तामिळनाडू निवडणुकीत मार्टिन फॅमिलीचा धमाका

Santiago Martin Electoral Bonds Donations Details: तामिळनाडू निवडणुकीत लॉटरी किंग सँटियागो मार्टिन यांची एंट्री चर्चेत आहे. पत्नी लीना रोझ सर्वात श्रीमंत उमेदवार ठरल्या असून कुटुंबातील सदस्य वेगवेगळ्या पक्षांतून निवडणूक लढवत आहेत.

Vinod Patil

तामिळनाडू निवडणुकीत सध्या फक्त एकाच नावाची चर्चा आहे आणि ते नाव म्हणजे लॉटरी किंग सँटियागो मार्टिन. मार्टिन यांनी आपल्या पत्नीला निवडणुकीच्या मैदानात उतरवलंय आणि लीना रोज या तामिळनाडूतील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरल्या आहेत. केवळ सहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या लीना रोझ यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात १,०४९ कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली आहे. एवढेच नाही, तर त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात पती सँटियागो मार्टिन यांच्या ३,२६२ कोटी रुपयांच्या मालमत्तेचीही घोषणा केली आहे.

२०१९ ते २०२४ दरम्यान इलेक्टोरल बॉण्ड्सद्वारे १,३६८ कोटी रुपयांची देणगी देऊन सँटियागो मार्टिन हे राजकीय पक्षांना सर्वाधिक देणगी देणारे देणगीदार ठरले होते. मार्टिन हे तामिळनाडूचे भूमीपुत्र आहेत. मात्र त्यांनी सर्वाधिक देणगी कोणत्या पक्षाला दिली हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. मार्टिन यांनी १,३०० कोटीं रुपयांच्या इलेक्टोरल बॉन्ड पैकी सुमारे ५४२ कोटी रुपये एकट्या पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसला दिले. ममता दीदींना दिलेल्या या देणगीमुळे मार्टिन देशभरात चर्चेचा विषय ठरले होते. टीएमसीनंतर, मार्टिन यांनी तामिळनाडूच्या स्टॅलिन यांच्या DMK या पक्षाला ५०३ कोटी रुपयांची देणगी दिली.

त्या खालोखाल भाजपला १०० कोटी, वायएसआर काँग्रेसला १५४ कोटी आणि काँग्रेसला ५० कोटी रुपये निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून दिले. मात्र आता निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी, लॉटरी किंग सँटियागो मार्टिन यांच्या कुटुंबाने त्यांच्या पहिल्या निवडणुकीसाठी एक दोन नव्हे तर वेगवेगळ्या तीन राजकीय पक्षांकडून निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. मार्टिन यांच्या पत्नी रोझ या AIDMKच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांचे जावई, आधव अर्जुन, चित्रपट अभिनेते विजय थलपथी यांच्या नेतृत्वाखालील TVK पक्षाकडून निवडणुकीच्या मैदानात आहेत. दुसरीकडे त्यांचे मोठे पुत्र जोस चार्ल्स मार्टिन यांनी पुदुचेरीमध्ये स्वतःचा राजकीय पक्ष LJK स्थापन करून भाजपच्या एनडीएसोबत युती केलीय. आता त्यांची नजर थेट केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुचेरीच्या मुख्यमंत्रीपदावर आहे. फ्युचर गेमिंगच्या लॉटरी विक्रीतून मार्टिनची वार्षिक उलाढाल ₹१५,००० कोटींहून अधिक असली तरी, ही कंपनी प्रामुख्याने सिक्कीम राज्य लॉटरी चालवते.

या लॉटरीची ९० टक्क्यांपेक्षा जास्त विक्री पश्चिम बंगालमधून होते. २००३ मध्ये, तत्कालीन मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या नेतृत्वाखालील तामिळनाडू सरकारने लॉटरीवर बंदी घातली; लॉटरीमध्ये सहभागी होणाऱ्या अनेकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक वाताहत होत असल्याच्या अहवालांचा आधार घेऊन हा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयामुळे त्यांच्या व्यवसायाला मोठा धक्का बसला. २०११ मध्ये, जयललिता यांच्याच कार्यकाळात, मार्टिनला जमीन बळकावल्याच्या एका प्रकरणात अटक करण्यात आली होती. मार्टिनला अनेक महिने तुरुंगात काढावे लागले होते. आता, याच तामिळनाडूतल्या निवडणुकांनंतर हा लॉटरी किंग तामिळनाडूच्या राजकारणातला किंग बनेल की किंगमेकर याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Pune Expressway Missing Link: मुंबई- पुणे कनेक्टिव्हिटी बिघडली; एक्सप्रेसवेवर कोंडी नियोजनचं 'मिसिंग'

LPG Cylinder: महागाईच्या झळा, सामान्यांना 'कळा'! व्यावसायिक सिलेंडर 993 रुपयांनी महागला; खाद्यपदार्थांच्या किंमती वाढणार?

Pune Crime: गुरांच्या गोठ्यात ४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, लैंगिक अत्याचारानंतर चिमुरडीची हत्या

Mumbai Pune Missing Link : 'मिसिंग लिंक'ला विरोध; लोणावळ्यातून प्रवेश देण्याची मनसेची मागणी

Ladki Bahin Yojana: राज्यातील १ कोटी ८९ लाख लाडक्या बहिणी पात्र; ५४ लाख बहिणींना नाही मिळणार १५०० रुपये

SCROLL FOR NEXT