जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत श्रीमंत शहर लॉस एंजेलिस आगीच्या विळख्यात सापडलंय. यात अनेक हॉलिवूड सेलिब्रेटींचे बंगले जळून खाक झालेत. लॉस एंजेलिसमधल्या अग्नीतांडवामध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, प्रियंका चोप्रा आणि नोरा फतेही यांचे बंगले बेचिराख झाले आहेत. त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....
हा कुठल्या युद्धाचा प्रसंग नाही. तर ही दृश्य आहेत महासत्ता असलेल्या अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजेलिस शहरामधील. अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमधील जंगलाला लागलेल्या आगीचा भडका उडाला आणि त्याचं अक्षरशः वणव्यात रुपांतर झालं आहे. या वणव्याने लॉस एंजेलिस शहराला कवेत घेत बेचिराख केलंय.
तर या आगीचा सर्वाधिक फटका हॉलिवूडला बसलाय. अनेक अभिनेत्यांची घरं जळून खाक झालेत. प्रियंका चोप्राने व्हिडीओ शेअर करत आगीचं भीषण रुप दाखवलंय. तर या आगीची शाहरुख खानच्या घरालाही झळ बसलीय. दुसरीकडे आपलं घर आगीच्या भक्षस्थानी पडल्याने नोरा फतेहने दुःख व्यक्त केलं आहे.
गेल्या 5 दिवसांपासून अमेरिकेत 6 ठिकाणी वणवा पेटलाय. त्यात कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजेलिसचा हॉलिवूड हिल्स हा अतिश्रीमंत भाग आगीच्या कचाट्यात सापडलाय. आतापर्यंत तब्बल 21 हजार एकर भाग जळून खाक झालाय. तर 11 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे लॉस एंजेलिसमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. तर लाखो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. ही आग सांता मोनिका पर्वतरांगेतील माऊंट ली येथील हॉलिवूड साईनच्या दिशेने भडकत चाललीय.
खरंतर अमेरिकेत वणवा लागण्याची ही पहिली घटना नाही. याआधीही मोठे वणवे लागले आहेत. मात्र महासत्तेचा दावा करणाऱ्या अमेरिकेला जीडीपीत पाचवा क्रमांक असलेल्या कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजेलिसमधील अग्नीतांडव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात अपयश आलंय. त्यामुळे आता ही आग कधी आटोक्यात येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.