Elon Musk Congratulates Narendra Modi Saam TV
देश विदेश

Elon Musk: एलन मस्क यांनी नरेंद्र मोदींना दिल्या शुभेच्छा, भारतात टेस्लाच्या कामाबद्दल केली मोठी घोषणा

Elon Musk Congratulates Narendra Modi: नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधापदाची शपथ घेणार आहेत. टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या.

Priya More

भारताच्या पंतप्रधानपदाची सूत्रे सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी (Narendra Modi) हाती घेणार आहे. नरेंद्र मोदींनी एनडीएच्या संसदीय नेतेपदी निवड झाल्यानंतर शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची (Droupadi Murmu) भेट घेतली. रविवारी म्हणजेच ९ जून रोजी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. लोकसभा निवडणूक २०२४ च्या (Loksabha Election 2024) निवडणूक निकालांमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने लोकसभा निवडणुकीमध्ये ५४३ पैकी २९३ जागा जिंकल्या आहेत.

नरेंद्र मोदींना या विजयासाठी जगभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी नरेंद्र मोदींना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे अभिनंदन केले. एलन मस्क यांनी आपल्या अधिकृत एक्स हँडलवर पोस्ट करत मोदींना शुभेच्छा देत सांगितले की, 'त्यांच्या कंपन्या भारतात काम करण्यास उत्सुक आहेत.'

एलन मस्क यांच्या एक्स पोस्टवरून हे स्पष्ट झाले आहे की एलन मस्क यांच्या कंपन्या भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. एलन मस्क काही दिवसांपूर्वीच भारत दौऱ्यावर येणार होते. मात्र शेवटच्या क्षणी त्यांचा दौरा रद्द करण्यात आला होता. गेल्या वर्षी जून महिन्यात जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. तेव्हा एलन मस्क यांनी त्यांची भेट घेतली आणि स्वतःला नरेंद्र मोदींचे चाहते असल्याचे सांगितले होते.

नरेंद्र मोदी यांना विजयाबद्दल इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. जॉर्जिया मेलोनी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की, 'इटली आणि भारताला जोडणारी मैत्री मजबूत करण्यासाठी आणि आपल्या देशांच्या आणि लोकांच्या कल्याणासाठी आम्हाला जोडणाऱ्या विविध मुद्द्यांवर सहकार्य आणखी मजबूत करण्यासाठी एकत्र काम करण्यासाठी उत्सुक आहे.'

लोकसभा निवडणुकीच्या निकालात एनडीएला २९३ जागांसह पूर्ण बहुमत मिळाले आहे. याबाबत भूतानचे पंतप्रधान कशेरिंग तोबगे म्हणाले की, 'माझे मित्र नरेंद्र मोदीजींना सलग तिसऱ्यांदा जगातील सर्वात मोठ्या निवडणूक जिंकल्याबद्दल अभिनंदन. ते भारताला सतत नवीन उंचीवर नेत आहेत. मी त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये पुराच्या पाण्यात स्कूलबस गेली वाहून

Sharvari Wagh: माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीचा मॉर्डन एथनिक लूक पाहिलात का?

भाजपला मोठा धक्का; शेकडो कार्यकर्त्यांसह माजी मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Asia Cup : रिंकू-सॅमसन OUT, केएल राहुल-पराग IN, आशिया चषकासाठी भज्जीने निवडला संघ, वाचा

Curd Health Effects: दहीसोबत हे ५ पदार्थ कधीही खाऊ नका

SCROLL FOR NEXT