देश विदेश

Loksabha Election: नरेंद्र मोदीच होणार पंतप्रधान; मोदींना २१ पक्षांचे समर्थन

Third Time Modi Become Pm : पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेली एनडीएची बैठक संपलीय. या बैठकीत नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू एकत्र बसलेले दिसले. यानंतर मोदी हेच पंतप्रधान व्हावे यासाठी २१ पक्षांनी समर्थन पत्र दिलं.

Bharat Jadhav

काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेरची मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती मुर्म यांची भेट घेत पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मंत्रिमंडळानेही राजीनामा दिला. काळजीवाहू पंतप्रधान मोदींनी सत्ता स्थापनेचा दावा केलाय. नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत यासाठी २१ पक्षांनी समर्थन पत्र दिलंय.

पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेली एनडीएची बैठक संपलीय. या बैठकीत नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू एकत्र बसलेले दिसले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू यांच्यासह सर्व घटक पक्षांनी बैठकीत समर्थनाची पत्रे दिली. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या नावाने ही पत्रे लिहिली आहेत. एनडीएच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदाची निवड झाली असून वरिष्ठ नेते मोदींसोबत जाऊन सरकार स्थापनेचा दावा केला जाणार आहे.

आज झालेल्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची एनडीएचे नेते म्हणून एकमताने निवड करण्यात आलीय. या बैठकीत नितीश कुमार यांनी लवकरच सरकार स्थापन करावे, असं सांगितलं. दरम्यान राष्ट्रपतींना भेटण्यासाठी एनडीएकडून ७ वाजण्याची अशी वेळ मागितली गेली होती. बैठकीत राजनाथ सिंह, पक्षाध्यक्ष जेपी नड्डा आणि अमित शहा हे मित्रपक्षांसोबत सरकारकडून चर्चा करतील. तासाभराच्या बैठकीनंतर सर्व नेत्यांनी पंतप्रधान मोदींबाबत ठराव मंजूर केला. या प्रस्तावावर २० नेत्यांच्या सह्या आहेत. जेडीयू प्रमुख नितीश कुमार आणि टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी या प्रस्तावावर स्वाक्षरी केली.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जेडीएस प्रमुख एचडी कुमारस्वामी, जितन राम मांझी आणि चिराग पासवान आदी नेत्यांनीही या समर्थन पत्रावर त्यावर स्वाक्षऱ्या केल्या. पवन कल्याण, अनुप्रिया पटेल, जयंत चौधरी, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, इंदिरा त्रिशंकू सुबका, सुदेश महतो, राजीव रंजन सिंग, प्रमोद बोरो, अतुल बोरो, संजय झा हेही या बैठकीत उपस्थित होते.

एनडीएची ही बैठक दिल्लीच्या ७ लोककल्याण मार्गावरील पंतप्रधान निवासस्थानी झाली. या बैठकीला एनडीएचे सर्व नेते उपस्थित होते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. दरम्यान सर्व नेत्यांनी प्रथम पंतप्रधानांचे विजयाबद्दल अभिनंदन केले. यानंतर त्यांनी आपले समर्थन पत्र पंतप्रधानांना सादर केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 जून रोजी नव्या एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2025: ७ सप्टेंबरला दुर्मिळ चंद्रग्रहण, या ३ राशींना होणार भरपूर फायदा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न

ITR Filling: आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वाढण्याची शक्यता, आतापर्यंत फक्त ४.५६ कोटी करदात्यांनी केलाय अर्ज

Ganesh Visarjan 2025: बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकीत पायांची काळजी कशी घ्याल? हे उपाय करतील तुमची मदत

Baaghi 4 OTT Release : जबरदस्त ॲक्शन अन् रोमान्सचा धमाका, टायगर श्रॉफचा 'बागी ४' कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार?

SCROLL FOR NEXT