rahul gandhi and narendra modi  saam tv
देश विदेश

Loksabha Election 2024: एनडीएमध्ये ४१ पक्ष तर इंडिया आघाडीमध्ये ३७ पक्ष, एका क्लिकवर वाचा संपूर्ण लिस्ट

How Many Parties In NDA And India Alliance: देशामध्ये भाजपप्रणित एनडीए २९४ जागांवर विजयी झाले आहे. तर काँग्रेसप्रणित इंडिया आघाडी २३१ जागांवर विजयी झाले आहेत. इंडिया आघाडीला देशामध्ये चांगले यश मिळाले आहे. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Priya More

लोकसभा निवडणुकीचा निकाल (Loksabha Election Result 2024) खूपच धक्कादायक असल्याचे पाहायला मिळाले. ट्रेंडमध्ये एनडीएने बहुमताचा आकडा पार केला आहे. पण विरोधक देखील मागे नाहीत. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीने चांगली कामगिरी केली. नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या 'अबकी बार ४०० पार'चा नारा त्यांना पूर्ण करता आला नाही.

देशामध्ये भाजपप्रणित एनडीए २९४ जागांवर विजयी झाले आहे. तर काँग्रेसप्रणित इंडिया आघाडी २३१ जागांवर विजयी झाले आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि टीडीपीचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू हे किंगमेकरच्या भूमिकेत आहेत. त्यांच्या भूमिकेकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे. एनडीएने बहुमताचा आकडा पार केला असला तरी देखील त्यांचे टेन्शन कमी झाले नाही. निकालानुसार भाजपला पूर्ण बहुमत नाही. एनडीएतील मित्र पक्षांच्या सहमतीने त्यांना पूर्ण बहुमत मिळाले आहे. इंडिया आघाडी या खासदारांची किंवा पक्षांची तोडफोड करू शकतो. त्यामुळे भाजप चिंतेत आहे.

मागच्या वर्षी जुलै महिन्यामध्ये दोन डझनपेक्षा जास्त विरोधी पक्षांनी एकाच व्यासपीठावर एकत्र येत केंद्रातील मोदी सरकारचा पराभव करण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना केली होती. लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीने भाजपप्रणित एनडीएला जोरदार टक्कर दिली आणि देशामध्ये इंडिया आघाडीला चांगले यश मिळाले. इंडिया आघाडीमध्ये आणि एनडीएमध्ये किती पक्षांचा समावेश आहे असा प्रश्न अनकेांना पडला आहे. तर एनडीएमध्ये ४१ पक्षांचा समावेश आहे. तर इंडिया आघाडीमध्ये ३७ पक्षांचा समावेश आहे. यामध्ये राष्ट्रीय पक्ष आणि राज्यातील स्थानिक पक्षांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये सर्व छोट्या-मोठ्या पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली होती.

एनडीएमध्ये या पक्षांचा समावेश -

- भारतीय जनता पार्टी (भाजप)

- राष्ट्रीय पक्ष (एनपीपी)

- ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन (एजेएसयूपी)

- ऑल इंडिया एन.आर. काँग्रेस (AINRC)

- अपना दल (सोनेलाल) (एडीएस)

- आसाम गण परिषद (एजीपी)

- हिल स्टेट पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (एचएसपीडीपी)

- इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा (आयपीएफटी)

- जनता दल (सेक्युलर) (जेडीएस)

- जनता दल (युनायटेड) (जेडीयू)

- लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) (एलजेपीआरव्ही)

- महाराष्ट्र गोमंतक पार्टी (एमजीपी)

- नागा पीपल्स फ्रंट (एनपीएफ)

- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (एनसीपी)

- राष्ट्रीय लोकशाही प्रोग्रेसिव्ह पार्टी (एनडीपीपी)

- राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी (RLJP)

- शिवसेना शिंदे गट (SHS)

- सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा (SKM)

- तेलुगु देसम पार्टी (TDP)

- टिप्रा मोथा पार्टी (TMP)

- युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी (UDP)

- युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल (UPPL)

- अम्मा पीपल्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (AMMK)

- तामिळनाडू पीपल्स प्रोग्रेस असोसिएशन (TMMK)

- भारत धर्म जन सेना (BDJS)

- गोरखा राष्ट्रीय मुक्ती मोर्चा (GNLF)

- हरियाणा लोकहित पार्टी (HLP)

- हिंदुस्थानी सार्वजनिक मोर्चा (HAM)

- जन सुराज्य शक्ती (ISS))

- जनसेना पार्टी (JSP)

- केरळ कामराज काँग्रेस (KKC) -

- निषाद पार्टी (NP)

- प्रहार जनशक्ती पार्टी (PJP)

- पट्टाली मक्कल काची (PMK)

- पुथिया निधी कच्ची (PNK)

- राष्ट्रीय लोक दल (RLD)

- राष्ट्रीय लोक दल फ्रंट (RLM)

- राष्ट्रीय समाज पार्टी (RSP)

- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) (RPIA)

- सुहलदेव भारतीय समाज पार्टी (SBSP)

- तमिळ मनिला काँग्रेस (मूपनार) (TMCM)

इंडिया आघाडीमध्ये या पक्षांचा समावेश -

- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)

- कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) (CPIM)

- आम आदमी पार्टी (आप)

- तृणमूल काँग्रेस (TMC)

- भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI)

- द्रविड मुनेत्र कळघम (DMK)

-जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स (JKNC)

- झारखंड मुक्ती मोर्चा (IMM)-

- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) (NCP SP)

- राष्ट्रीय जनता दल (RJD)-

- समाजवादी पार्टी (SP)

- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (SHS UBT)

- अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक (एआयएफबी)

- कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) लिबरेशन (सीपीआय एमएल एल)

- क्रांतीवादी समाजवादी पार्टी (आरएसपी)

- केरळ काँग्रेस एम (केसी एम)

- विदुथलाई चिरुथाईगल काची (व्हीसीके)

- मारुमलार्ची द्रविड मुन्नेत्र कळघम (एमडीएम))

- जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी)

- केरळ काँग्रेस (केसी)

- इंडियन युनियन मुस्लिम लीग (आययूएमएल)

- राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष (आरएलपी)

- मनिथनेय मक्कल काची (एमएमके)

- कोंगुनाडू मक्कल देसिया काची (केएमडीके)

- भारतीय किसान आणि मजदूर पार्टी (PWPI)

- रायजोर दल (RD)

- आसाम राष्ट्रीय परिषद (AJP).

- अंचलिक गण मोर्चा (AGM)

- ऑल पार्टी हिल लीडर्स कॉन्फरन्स (APHLC)

- गोवा फॉरवर्ड पार्टी (GFF)

- हमरो पार्टी (HP)

- मक्कल नीधी मैयम (MNM))

- जन अधिकार पार्टी (JAP)

- विकासशील इंसान पार्टी (VIP)

- पूर्वांचल लोक परिषद (PLP)

- जाती पार्टी ऑफ आसाम (JDA)

- समाजवादी रिपब्लिक पार्टी (SGP)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT