PM Modi Saam tv
देश विदेश

BJP Meeting : भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लान ठरणार?

Loksabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थिती ही बैठक पार पडणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि समितीचे सदस्य देवेंद्र फडणवीस हे देखील बैठकीला उपस्थित असणार आहेत.

Pramod Subhash Jagtap

New Delhi :

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे. राष्ट्रीय अधिवेशन संपल्यानंतर दुपारी बैठक होणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब या बैठकीत होण्याची शक्यता आहे. ज्या जागांवर 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता, त्या जागांवरील उमेदवारांच्या नावावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. (latest political news)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थिती ही बैठक पार पडणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि समितीचे सदस्य देवेंद्र फडणवीस हे देखील बैठकीला उपस्थित असणार आहेत. याच महिन्याच्या शेवटी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे.

निवडणुकीची रणनीती ठरवणे, उमेदवार निवडणे आणि प्रचार चालवणे यावर पक्ष चर्चा करणार आहे. या बैठकीत पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावरही भर दिला जाणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सरकारची धोरणे आणि कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्यावरही बैठकीत चर्चा होणार आहे. सरकारच्या कामगिरीवर प्रकाश टाकण्याचा आणि विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी तयारी केली जाऊ शकते. विरोधी पक्षांविरोधात रणनीती तयार करण्यावरही चर्चा होणार आहे.

भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. राम मंदिर पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद ठराव आज मांडला जाणार अधिवेशनात मांडला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील आज कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

Sushil Kedia: ठाकरेंची माफी मागून केडियानं पुन्हा पलटी मारली; म्हणाला 'काय बोललो याचा पश्चाताप नाही'

CHYD : 'चला हवा येऊ द्या' महाराष्ट्राला खळखळून हसवायला सज्ज; कॉमेडीचं गँगवॉर 'या' दिवसापासून सुरू, पाहा VIDEO

दारूचे पैसे न दिल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण; घटना CCTVत कैद

SCROLL FOR NEXT