लोकसभा निवडणुकीआधीच काँग्रेसलसा गळती लागली आहे. काँग्रेसचे अनेक बडे नेते पक्ष सोडत आहेत. महाराष्ट्रात महिनाभरात तीन बड्या नेत्यांना पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. आता देशातील आणखी दोन बडे नेते भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ काँग्रेस सोडून त्यांचा मुलगा नकुलसह भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. कारण कमलनाथ आणि नकुलनाथ यांच्या काँग्रेस सोडण्याच्या बातम्या राजकीय वर्तुळात रंगत आहेत. दरम्यान नकुलनाथ यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट एक्स, इन्स्टाग्राम आणि फेसबुकचा बायो बदलला आहे. त्यातून त्यांनी काँग्रेसचे नाव काढून टाकले आहे. त्यामुळे ते काँग्रेस सोडण्याच्या चर्चा आणखी जोर धरु लागल्या आहेत.
माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चांदरम्यान काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्याबाबतही अशीच माहिती समोर येत आहे. सिद्धू निवडणुकीपूर्वी काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.
मात्र सिद्धू यांच्या टीमने ते काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताला केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे. सिद्धू काँग्रेस आणि राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे टीमचे म्हणणे आहे.
जर कमलनाथ आणि सिद्धू यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला तर तो पक्षासाठी मोठा धक्का असेल. याचा थेट परिणाम लोकसभा निवडणुकीवर होणार आहे. कमलनाथ भाजपमध्ये गेल्याने मध्य प्रदेश काँग्रेस आणखी कमकुवत होऊ शकते. तर पंजाबमध्ये काँग्रेस तशीच कमजोर आहे. सिद्धू यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने ते आणखी कमकुवत होणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.