Lok Sabha Speaker Elections News Saam TV
देश विदेश

Lok Sabha Speaker Elections : लोकसभा अध्यक्षपदासाठी ४७ वर्षांनंतर आज निवडणूक; INDIA आघाडी धक्कातंत्राचा वापर करणार?

Lok Sabha Speaker Elections News : तब्बल ४७ वर्षानंतर आज बुधवारी लोकसभा अध्यक्षपदासाठी संसदेत मतदान होणार आहे. यापूर्वी लोकसभाध्यक्षपदासाठी १९५२, १९६७ आणि १९७६ अशा तीन प्रसंगी निवडणूक झाली होती.

Satish Daud

लोकसभा अध्यक्षपदाची निवड सहमती करण्याचे भाजपचे प्रयत्न फोल ठरले. विरोधकांचे मन वळवण्यात भाजपला अपयश आले. त्यामुळे तब्बल ४७ वर्षानंतर आज बुधवारी लोकसभा अध्यक्षपदासाठी संसदेत मतदान होणार आहे. यापूर्वी लोकसभाध्यक्षपदासाठी १९५२, १९६७ आणि १९७६ अशा तीन प्रसंगी निवडणूक झाली होती.

लोकसभा अध्यक्षपदासाठी भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून ओम बिर्ला उमेदवार आहेत. तर दुसरीकडे विरोधकांच्या इंडिया आघाडीने के. सुरेश यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. दोन्ही उमेदवारांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. लोकसभाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी असे एनडीएचे प्रयत्न होते.

याची जबाबदारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे सोपवण्यात आली होती. दोन्ही मंत्र्‍यांनी विरोधकांशी बोलणी देखील केली. राजनाथ सिंह यांच्या प्रस्तावावर काँग्रेससह इंडियातील घटक पक्षांनी सहमतीही दाखवली. मात्र, आम्हाला लोकसभेचे उपाध्यक्षपद हवंय, अशी मागणी इंडिया आघाडीने केली.

त्यामुळे उपाध्यक्षपदाच्या मुद्द्यावर ही बोलणी फिस्कटली. त्यानंतर एनडीए आणि इंडिया आघाडीने आपआपल्या उमेदवारांची नावे लोकसभा अध्यक्षपदासाठी जाहीर केली. दरम्यान, आज (बुधवारी) सकाळी ११ वाजता मतदान होणार आहे. त्यानंतर निकाल जाहीर होईल. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना धक्का देण्यासाठी विरोधक काय रणनिती आखणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

संसदेतील खासदारांचे आकडे काय सांगतात?

सभागृहात भाजप प्रणित एनडीएचे २९३ खासदार तर इंडिया आघाडीकडे २३३ सदस्य आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वायनाडमधून खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे सभागृहातील सदस्य संख्या ५४२ झाली आहे. किमान तीन अपक्ष सदस्यही विरोधी गटात असल्याचे सांगितले जात आहे. लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बहुमतासाठी २७१ सदस्यांचा पाठिंबा असणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT