Rahul Gandhi Defamation Case SAAM TV
देश विदेश

Rahul Gandhi News: मोठी बातमी! राहुल गांधींना खासदारकी बहाल, लोकसभा सचिवालयाकडून अधिसूचना जारी

MP Rahul Gandhi: आजपासून राहुल गांधी हे लोकसभेमध्ये उपस्थित राहणार आहेत.

Priya More

प्रमोद जगताप, दिल्ली

Delhi News: काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना खासदारकी बहाल करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालायकडून राहुल गांधींना पुन्हा लोकसभा सदस्यता देण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाकडून याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे संसदेमध्ये पुन्हा गांधी वादळ धडकणार आहे. आज पुन्हा राहुल गांधी आणि मोदी सरकार संसदेत आमने सामने दिसणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आज लोकसभा सदस्यत्व पुन्हा बहाल करण्यात आले आहे. राहुल गांधीसह काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यासाठीची सर्व आवश्यक कागदपत्रे लोकसभेच्या सचिवालयकडून सोमवारी पडताळण्यात आली. त्यानंतर राहुल गांधी यांना खासदारकी बहाल करण्यात आली. राहुल गांधींच्या खासदारकीबदद्ल लोकसभा सचिवालयाकडून अधिसूचना देखील जारी करण्यात आली.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा आहे. आजपासून राहुल गांधी हे लोकसभेमध्ये उपस्थित राहणार आहेत. राहुल गांधी हे आज लोकसभेत अविश्वास ठराव प्रस्तावाच्या चर्चेत सहभागी होणार असल्याचे देखील सांगितले जात आहे. राहुल गांधी यांना खासदारकी परत मिळाल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

दरम्यान, 'मोदी आडनाव' यावरुन केलेल्या वक्तव्याप्रकरणी सूरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. सूरत न्यायालयाच्या या निर्णयानंतर राहुल गांधी यांना खासदारकी देखील गमवावी लागली होती. पण राहुल गांधींना दोषी ठरवण्याचा सूरत न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या महत्वपूर्ण निर्णयानंतर राहुल गांधी यांना आज खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricketer Accident: वेस्टइंडीजच्या स्टार खेळाडूचा भीषण अपघात! कारचा झालाय चुराडा

Pune Politics: मतदानापूर्वीच पुण्यात मनसेला खिंडार, अनेक पदाधिकाऱ्यांनी 'तुतारी' घेतली हाती

Maharashtra News Live Updates: बारामतीमध्ये जय पवार बाईक रॅलीमध्ये सहभागी

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

SCROLL FOR NEXT