Chandrasekhar Bawankule: देवेंद्रजींच्या मास्टरस्ट्रोकमुळे तुम्हाला घरी बसावं लागलं; उद्धव ठाकरेंच्या टीकेवर बावनकुळेंचं खरमरीत प्रत्युत्तर

Chandrasekhar Bawankule On Uddhav Thackeray: उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी भाजपवर खरमरीत टीकास्त्र सोडलं आहे.
Chandrashekhar Bawankule Vs Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule Vs Uddhav ThackeraySaam TV
Published On

Maharashtra Political News: काल शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड यांच्या राज्य आणि जिल्हा कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक मुंबईच्या रंगशारदा सभागृहात पार पडली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी भाजपवर खरमरीत टीकास्त्र सोडलं होतं. त्यांच्या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील खरमरीत प्रत्युत्तर दिलं आहे. (Latest Marathi News)

"मोदीजींवर टीका करण्याची उद्धव ठाकरेंची लायकी नाही", अशी घणाघाती टीका बावनकुळे यांनी केली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी फोडणारे औरंगजेबच आहेत. असं वक्तव्य काल उद्धव ठाकरेंनी केलं होतं. तसेच यावेळी त्यांनी मोदींवर देखील निशाणा साधला होता.

Chandrashekhar Bawankule Vs Uddhav Thackeray
Ahmednagar Crime News: पती पत्नीच्या वादात घडलं भयंकर... क्रूर पित्याने पोटच्या २ मुलांना विहिरीत फेकलं; कर्जत तालुक्यात खळबळ!

उद्धव ठाकरेंच्या कालच्या भाषणातील प्रत्येक मुद्द्यावर प्रत्युत्तर देण्यासाठी बावनकुळेंनी एक ट्वीट पोस्ट केलं आहे. "ज्यांना वडिलांनी स्थापन केलेला पक्ष टिकवता आला नाही ते उद्धव ठाकरे म्हणत आहेत की, भाजपमध्ये राम उरला नाही. तुम्ही सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवलं. आता प्रभू श्रीरामचंद्रांची तुम्हाला आठवण येत आहे."

"राम मंदिराचं भूमीपूजन झालं तेव्हा जल्लोष करणाऱ्या रामभक्तांवर तुमच्या सरकारनं राज्यभर गुन्हे दाखल केले होते. हे तुम्ही विसरलात की काय?, असा प्रश्न बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना विचारलाय. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याची तुमची लायकी नाही हे अनेकदा तुम्हीच सिद्ध केले आहे. तसेच देवेंद्रजी मस्टर मंत्री नाही तर मास्टर आहेत. त्यांच्या मास्टरस्ट्रोकमुळेच तुम्हाला घरी बसावं लागलं", असा घणाघात बावनकुळेंनी केला आहे.

Chandrashekhar Bawankule Vs Uddhav Thackeray
Nashik Crime News: नाशिकमध्ये बिल्डरच्या घरी चोरी; तब्बल साडे आठ लाखांचा ऐवज लंपास... परिसरात खळबळ

तुमच्या सत्तेला जनतेचा सुरूंग

औरंग्याच्या प्रवृत्तीसोबत कोण बसलं आहे. हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलंय. औरंग्याच्या सत्तेला जसा छत्रपती शिवरायांनी सुरुंग लावला. तसाच सुरूंग जनतेनं तुमच्या सत्तेला लावला. 2024 सालीही जनता पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांच्या शिवसेनेला आणि भाजपला निवडून देईल. तोवर तुम्ही औरंग्या, अफझल खान आणि इंग्रजांचा उदो उदो करत बसा कारण लोकांनी तुम्हाला सध्या तेवढंच काम दिलंय", अशी टीका चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com