Sambhaji Bhide News: संभाजी भिडेंच्या अडचणी वाढल्या, मुंबई हायकोर्टात याचिका दाखल; महात्मा गांधींबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य

Petition Filed Against Sambhaji Bhide: संभाजी भिडेंविरोधात आता मुंबई हायकोर्टात (Mumbai Highcourt) जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
Sambhaji Bhide
Sambhaji BhideSaam TV
Published On

Mumbai High Court News: महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे (Shiv Pratistan President Sambhaji Bhide) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. संभाजी भिडेंविरोधात आता मुंबई हायकोर्टात (Mumbai Highcourt) जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आजच तातडीची सुनावणी होणार आहे.

Sambhaji Bhide
Gadchiroli News: सुरजागड लोहखाणीत मोठी दुर्घटना! उत्खनन करणारे वाहन कोसळले; अभियंत्यासह तिघांचा मृत्यू

संभाजी भिडेंविरोधात कुमार महर्षी (Kumar Maharshi) यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केला आहे. या याचिकेवर आज मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर तातडीची सुनावणी होणार आहे. या याचिकेद्वारे कुमार महर्षी यांनी प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमांमधून प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या महापुरुषांबाबतच्या आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्यांबाबतचा प्रसार रोखण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची मागणी केली आहे.

Sambhaji Bhide
Nashik Accident News: धोंड्याच्या महिन्यात माहेरी आलेल्या लेकीसह आईवर काळाचा घाला; हृदयद्रावक घटनेने नाशिक हळहळलं

त्याचसोबत कुमार महर्षी यांनी महापुरूषांची बदनामी करणाऱ्यांची यादी तयार करून त्यांना प्रसारमाध्यमे किंवा समाजमाध्यमांतून वादग्रस्त टिप्पणी करण्यापासून मनाई करण्याचे आदेश राज्य सरकारला देण्याची देखील मागणी केली आहे. महापुरुषांबद्दलची वादग्रस्त वक्तव्य समाजमाध्यमांद्वारे प्रसारित केली जात असून त्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचा दावा त्यांनी या याचिकेतून केला आहे.

Sambhaji Bhide
Delhi Ordinance Bill: राज्यसभेत आज मांडले जाणार दिल्ली सेवा विधेयक; मोदी सरकारची अग्निपरीक्षा

दरम्यान, अमरावती येथील एका कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी, शिर्डीचे साईबाबा आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल अपशब्द काढले होते. त्यांनी असे सांगितले होते की, 'मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते. त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले. त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ आणि शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले होते.'

Sambhaji Bhide
Chandrayaan-3 News: गुड न्यूज! चांद्रयान-3 ने टिपला चंद्राचा पहिला फोटो, इस्रोने जारी केला व्हिडीओ...

संभाजी भिडेंच्या या वक्तव्यानंतर त्यांच्याविरोधात राज्यभर आंदोलन करण्यात येत आहेत. तसंच त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. त्यांच्याविरोधात राज्यभरातील अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विधानसभेमध्ये कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. 'महापुरुषांवर असं वक्तव्य करण्याचा कुणीच अधिकार दिलेला नाही. तसा अधिकार कुणालाच नाही. त्यामुळे असं करणाऱ्यांवर कारवाई होईल.', असं त्यांनी सांगितले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com