Nashik News: मृत्यू कधी आणि कसा चालून येईल याची कुणालाच काहीच कल्पना नसते. नाशिकमधून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. धोंड्यासाठी माहेरी आलेल्या लेकीचा आपल्या आईसह विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत. (Latest Marathi News)
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नाशिकच्या ओझरयेथील दत्तनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. धोंड्याच्या महिन्यात मुलगी बऱ्याच दिवसांनी माहेरी आली म्हणून घरात आनंदाचं वातावरण पसरलं होतं. आपल्या आनंदात अशा पद्धतीने मिठाचा खडा पडेल याची कुणालाच काही कल्पना नव्हती.
मुलीच्या माहेरी घरी टेरेसवर पेरूचे झाड आहे. पेरू खाण्याचा मोह झाल्याने ती टेरेसवर गेली होती. यावेळी पेरू तोडतांना उच्चदाबाच्या विज वाहिनी तारांना हातातील लोखंडी रॉडचा स्पर्श झाल्यानं तिला विजेचा जोरदार झटका बसला. विद्युतप्रवाह टेरेसवरील पाण्याच्या टाकीत उतरून पाण्याची टाकी फुटल्याने पाण्याचा करंट बसून आईचा देखील मृत्यू झाला. तर मोठा आवाज एकून जावई आपल्या दोन मुलांसह टेरेसवर धावत आले, मात्र पाण्यातील करंटने त्यांना दूर फेकल्याने ते बचावले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मीना यांचा मुलगा घराकडे परतत असताना त्याचाही अपघात होऊन तो गंभीर जखमी झालाय. या घटनेमुळे ओझर शहरावर शोककळा पसरलीय. आकांशा रणशुर आणि मीना सोनवणे अशी मृत मायलेकींची नावं आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.