Nashik ACB News : नाशिक एसीबीची कारवाई संशयाच्या भोवऱ्यात; पोलीस उपनिरीक्षकांवरील कारवाई चुकीची असल्याचा कुटुंबियांचा आरोप

Nashik News नाशिक एसीबीची कारवाई संशयाच्या भोवऱ्यात; पोलीस उपनिरीक्षकांवरील कारवाई चुकीची असल्याचा कुटुंबियांचा आरोप
Nashik ACB
Nashik ACBSaam tv
Published On

तबरेज शेख 

नाशिक : नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक पदी शर्मिष्ठा वालावलकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर (Nashik) नाशिक विभागातून सर्वात जास्त कारवाया करण्यात आल्या होत्या. मात्र आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागच (ACB) संशयाच्या भोवऱ्यात अडकला असल्याचं समोर आले आहे. पोलीस उपनिरीक्षकाच्या कुटुंबीयांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग खोट्या कारवाई करत असल्याचे सांगितले आणि यासंबंधीचे पुरावे साम टीव्हीच्या हाथी लागले आहे. (Latest Marathi News)

Nashik ACB
Poshan Aahar : पोषण आहाराच्या तांदळात दगडी खडी; जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार

नाशिक विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक पदी शर्मिष्ठा वालावलकर यांनी पदभार स्वीकारला आणि एका नंतर एक धडाधड कारवाया नाशिक विभागातून करण्यात आल्या. ३० ते ४० लाख रुपये रंगेहात लाच स्वीकारतानाच्या कारवाया देखील नाशिकमधूनच झाल्या. संपूर्ण राज्यात लाचखोरीमध्ये नाशिक विभाग अव्वल ठरला. हा भ्रष्टाचार मोडीत काढण्यासाठी शर्मिष्ठा वालावलकर यांनी लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर कारवाई केली. अशीच एक कारवाई नाशिक रोड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक गणपत महादू काकड यांच्यावर करण्यात आली होती. पाच हजार रुपयाची लाच (Bribe) घेताना त्यांना अटक करण्यात आली होती.  

Nashik ACB
Jalna News : संभाजी भिडेंच्या प्रतिमेची अंत्ययात्रा; शाब्दिक चकमकीनंतर पोलिसांचा समता परिषदेच्या आंदोलकांवर लाठीचार्ज

नवे दिलेली कर्मचारी घर झडतीच्या ठिकाणी नाहीच 

मात्र काकड यांच्यावर झालेली कारवाई चुकीची असल्याच काकड कुटुंबीयांनी सांगितले. यासंबंधीचे पुरावे देखील त्यांनी माध्यमांना दिले आहे. काकड यांच्या घरी पंचनामा करतेवेळी जे कर्मचारी यांची नावे तसेच पंचनामा करतानाची वेळ पंचनाम्यात दिलेली आहे; ही चुकीची आहे. कारण घर झडती सुरू असताना कर्मचाऱ्यांची नावे दाखवली गेली आहे. त्यावेळी ते कर्मचारी म्हसरूळ पोलीस ठाण्यामध्ये असल्याचं त्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पुरावा दिला. त्यामुळे काकडे यांच्यावर झालेली कारवाई संपूर्ण पद्धतीने चुकीची आहे आणि अशाच पद्धतीने इतर कारवाया झाल्या असल्याचा संशय देखील काकड कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. जर न्याय मिळाला नाही; तर मंत्रालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय

Nashik ACB
Nandurbar Bajar Samiti : सुधारीत विधेयकाची होळी; नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात निर्दशने

आरोप फेटाळले 
एकूणच लाचखोरींच्या कारवाया नाशिकमधून समोर येत असताना आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कामावरच पोलीस दलातील एका अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे. काकड यांच्यावर लाच घेतानाचा सीसीटीव्ही फुटेज काकड कुटुंबीय यांनी महितीच्या अधिकाराखाली मागवला. यात काकड यांच्या खिशामध्ये अँटी करप्शनचा कर्मचारी पैसे टाकत असल्याच निदर्शनास आले आहे. मात्र हा आमच्या कारवाईचाच एक भाग असल्याचं लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने स्पष्ट करण्यात आलय. लाच घेतानाच डेमो आम्हाला दाखवावा लागतो. काकड कुटुंबियांनी केलेले सर्व आरोप हे तथ्यहीन असल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी सांगितले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com