सागर निकवाडे
नंदूरबार : महाराष्ट्र सरकारने माथाडी १९६९चा कायद्यात सुधारणा करण्याच्या नावाखाली नवीन सुधारित (Nandurbar) अधिनियम लागू केले आहे. या कायद्यामुळे माथाडी कामगारांचे मोठं नुकसान होणार आहे. या कायद्याची विरोधात नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Bajar Samiti) आवारात गाडीवान अँड हमाल मापाडी गुमास्ता मजूर युनियनच्यावतीने विधेयकाची होळी करीत निदर्शने करण्यात आली. (Breaking Marathi News)
महाराष्ट्र शासनाने १९६९ साली पारित केलेल्या माथाडी कायद्याची स्तुती आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने केंद्र सरकारने देशभरातील काही राज्यांनी केली. त्या कायद्याचे आज महाराष्ट्रात काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी कायद्यात व धोरणात बदल अपेक्षित असताना सदर कायद्यात सुधारण्याच्या नावाखाली नकारात्मक बदल केलेले दिसत आहेत. नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्यामुळे या कायद्याच्या संपूर्ण विरोध करत आहेत.
आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
सदर विधेयक विधानसभेत देखील मंजुरीसाठी आणले जाणार आहे. परंतु या कायद्यात लवकरच बदल न केल्यात आणखीन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गाडीवान अँड हमाल मापाडी गुमास्ता मजूर युनियनच्यावतीने देण्यात आला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.