LokSabha Election Results 2024: 
देश विदेश

LokSabha Election Results 2024: 'या' ४ राज्यांमधील सरकारांना बसणार फटका?

Bharat Jadhav

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या निकाल उद्या जाहीर केला जाणार आहे.सकाळी ७ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्याआधी लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे एक्झिट पोलचे अंदाज जाहीर झालेत. या एक्झिट पोलमध्ये एनडीएला ३६१-४०१, तर इंडिया आघाडीला १३१ ते १६६ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आलाय.

अनेक राज्यात एनडीएला बहुमत मिळताना दिसत आहे, तर काही राज्यात एनडीएला अपयश येताना दिसत आहे. परंतु आंध्र प्रदेश,ओडिशा,तेलगंणा, पश्चिम बंगालमध्ये मोठी उलटफेर होणार असून येथील राज्य सरकारला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोणत्या राज्यात काय आहे स्थिती

वायएसआरचे पानिपत

येथे एकूण २५ जागांसाठी मतदान झालं. येथील सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला मोठा बसण्याची शक्यता आहे. टीडीपी, भाजप आणि जनसेना यांच्या एनडीएला २१ जागा मिळतील असं म्हटलं जात आहे.वायएसआरला २ ते ४ जागा मिळत असून इंडिया आघाडी भोपळाही फोडू शकणार नाही.

ओडिशामध्ये स्थिती काय

ओडिशामध्ये सत्ताधारी असलेल्या बीजेडीलाही फटका बसण्याची शक्यता आहे. येथे भाजप सर्वात मोठा पक्ष होण्याची शक्यता आहे. भाजपला येथे १८ ते २० जागा मिळतील. तर बीजेडीला फक्त २ जागा मिळेल,असा अंदाज आहे. दरम्यान २०१९ मध्ये बीजेडीला १२ जागा मिळाल्या होत्या.तर भाजपला ८ जागा मिळाल्या होत्या.

तेलंगणामधील स्थिती काय

येथे सत्तेत असलेल्या काँग्रेस सरकारलाही मोठा फटका बसताना दिसत आहे. काँग्रेस आणि बीआरएसला भाजपने जोरदार टक्कर देताना दिसत आहे. भाजपला येथे ११ ते १२ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर बीआरएसला १ जागा मिळेल अशी शक्यता आहे. याच बीआरएसला २०१९ मध्ये ९ जागा मिळाल्या होत्या. इतकेच काय ओवैसींच्या एमआयएमलाही फटका बसण्याची शक्यता आहे.

पश्चिम बंगालमध्ये काय होणार

पश्चिम बंगालमध्येही लोकसभा निवडणुकीचा फटका तृणमूल काँग्रेसच्या सरकारला बसणार आहे. मागील निवडणुकीत म्हणजेच २०१९ मध्ये २२ जागा मिळवणाऱ्या टीएमसीला यंदा ११ ते १४ जागा मिळतील असं म्हटलं जात आहे. भाजप ४६ टक्के मतांसह ४२ पैकी २६ ते ३१ जागा जिंकेल असा अंदाज वर्तवला जात आहे. तर काँग्रेस आणि डाव्यांच्या आघाडीला फक्त ०-२ जागा मिळू शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT