Ramesh Chennithala Saam Tv
देश विदेश

Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये मोठे बदल, महाराष्ट्राच्या प्रभारीपदी रमेश चेन्निथला यांची नियुक्ती

Ramesh Chennithala: पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाने संघटनेत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांची प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे

Satish Kengar

Congress Leader Ramesh Chennithala appointment as AICC Incharge of Maharashtra Congress:

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाने संघटनेत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या फेरबदलांतर्गत प्रियंका गांधी वाड्रा यांच्या जागी अविनाश पांडे यांना उत्तर प्रदेशचे प्रभारी बनवण्यात आले आहे. तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांची प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर राजीव शुक्ला यांच्याकडे हिमाचल प्रदेश आणि चंदीगडची जबाबदारी देण्यात आली आहे.

प्रियांका गांधी यांना सध्या कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. जयराम रमेश यांच्याकडे संचाराची जबाबदारी तर, केसी वेणुगोपाल यांच्याकडे संघटनेची जबाबदारी आहे. दिल्लीत शनिवारी झालेल्या महत्वाच्या नेत्यांच्या बैठकीनंतर पक्षाने ही माहिती दिली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याशिवाय मुकुल वासनिक यांना गुजरातचे प्रभारी बनवण्यात आले आहे. जितेंद्र सिंह यांची आसामचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे मध्य प्रदेशचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. रणदीप सिंग सुरजेवाला यांच्याकडे कर्नाटकची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय सचिन पायलट यांच्याकडे छत्तीसगड आणि कुमारी शैलजा यांच्याकडे उत्तराखंडची कमान सोपवण्यात आली आहे.  (Latest Marathi News)

दीपक बाबरिया यांना दिल्लीचे प्रभारी बनवण्यात आले आहे. त्यांच्याकडे हरियाणाचा अतिरिक्त कार्यभारही देण्यात आला आहे. त्याचबरोबर जीए मीर यांना झारखंडचे प्रभारी बनवण्यात आले असून त्यांच्याकडे पश्चिम बंगालचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. दीपा दास मुन्शी यांच्याकडे केरळ आणि लक्षद्वीपची जबाबदारी आली असून त्यांच्याकडे तेलंगणाचा अतिरिक्त कार्यभारही आहे.

यासोबतच मोहन प्रकाश यांच्याकडे बिहारची, सुखजिंदर सिंग रंधावाकडे राजस्थानची आणि देवेंद्र यादव यांच्याकडे पंजाबची जबाबदारी आली आहे. डॉ.चेल्लाकुमार यांना मेघालय, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेशचे प्रभारी बनवण्यात आले आहे. भरतसिंह सोलंकी यांच्याकडे जम्मू-काश्मीरची जबाबदारी देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अष्टविनायक महामार्गावर कवठे गावाजवळ ट्रक आणि दुध गाडीचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

Mumbai : सतत डोअरबेल वाजवल्याने सटकली, तरुणाने डिलिव्हरी बॉयवर केला गोळीबार; मुंबईत थरार

Rajesh Khanna: गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू; राजेश खन्ना यांनी या अभिनेत्रीसोबत केलं गुपचुप लग्न, अनेक वर्षांनंतर केला खुलासा

SCROLL FOR NEXT