Lok Sabha Election 2024 Timetable May Be Announced After 13 March
Lok Sabha Election 2024 Timetable May Be Announced After 13 March  Saam Tv
देश विदेश

Lok Sabha Election 2024 Schedule: लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक 'या' दिवशी होऊ शकतं जाहीर, जाणून घ्या किती टप्प्यात होऊ शकतं मतदान

Satish Kengar

Lok Sabha Election 2024 Schedule:

लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या तारखांबाबत मोठी अपडेट समोर आली. निवडणूक जाहीर होण्याआधीच राजकीय पक्षांनी आधीच तयारी सुरू केली आहे. आता निवडणूक आयोग लवकरच सार्वत्रिक निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करू शकते.

निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाचे (ECI) अधिकारी देशातील अनेक राज्यांना भेटी देत ​​आहेत. दरम्यान, 13 मार्चनंतर लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात, अशी बातमी समोर येत आहे. 7-8 टप्प्यात मतदान होऊ शकतं, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, निवडणूक आयोग 13 मार्चनंतर लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करू शकते. देशातील निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचे पथक राज्यांच्या दौऱ्यावर आहे. तसेच कोणत्या राज्यात किती टप्प्यात आणि कशा पद्धतीने निवडणूक प्रक्रियाचे नियोजन करता येईल, याचा आढावाही त्यांच्याकडून घेतला जात आहे.  (Latest Marathi News)

सध्या निवडणूक अधिकाऱ्यांची टीम तामिळनाडूमध्ये आहे. त्यानंतर ते उत्तर प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 13 मार्चपूर्वी राज्याचे दौरे पूर्ण होणार असल्याचा दावा इंडिया टुडेच्या बातमीत करण्यात आला आहे. अशातच 13 मार्च रोजी किंवा त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, एनडीए आणि इंडिया आघाडीने लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरु केली आहे. एकीकडे एनडीए मजबूत स्थित दिसत आहे. तर इंडिया आघाडीतने अनेक पक्ष त्यांना सोडून जात असल्याचं चित्र होतं. मात्र या आठवड्यात पुन्हा इंडिया आघाडी मजबूत होताना दिसत आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पक्षात युती झाली असून तिथे हे दोन्ही पक्ष एकत्रित येऊन निवडणूक लढवणार आहेत.

तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ज्या इंडिया आघाडीपासून दुरावल्या होत्या, त्याही पुन्हा एकदा आघाडीत सामील होऊ शकतात, अशी चर्चा आहे. तसेच टीएमसी आणि काँग्रेसमध्ये पश्चिम बंगालच्या लोकसभा जागांबद्दल चर्चा सुरु असल्याचं वृत्त आहे. तर यंदा भाजपने अब की बार 370 पारचा टार्गेट ठेवला आहे. तर एनडीएचा 400 पारचा टार्गेट आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: पुण्यातील लार्गो पिझ्झा हॉटेल आग

Astro Tips: संध्याकाळी या वेळी लावा दिवा, लक्ष्मी येईल घरात

Mumbai News : ठाकरे गटाला भाजप उमेदवाराच्या कार्यलयाबाहेरील राडा भोवला, मुलुंडमधील 5 शिवसैनिकांना अटक

Krishi Seva Kendra: तीन कृषी सेवा केंद्राचे परवाने रद्द, नगरमध्ये खळबळ

Hingoli News: वय उलटूनही लग्न जमेना, नैराश्यातून तरुणाने संपवलं जीवन; हिंगोलीतील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT