High Court on Manoj Jarange: मराठा आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट करा; उच्च न्यायालयाचे मनोज जरांगेंना निर्देश

High Court on Manoj Jarange Patil's Maratha Andolan: मनोज जरांगे आणि मराठा आंदोलक समिती प्रस्तावित आंदोलन कसं करणार आहेत? आंदोलन हिंसक होणार नाही, याची जबाबदारी ते घेणार आहेत का? अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली आहे.
High Court Notice on Manoj Jarange Patil
High Court Notice on Manoj Jarange PatilSaam Digital

सचिन गाड | मुंबई

Manoj Jarange Patil News :

राज्य सरकारने मराठा समजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन घेत ठराव एकमताने मंजूर केला आहे. मात्र आम्हाला जे पाहिजे नाही आरक्षण दिलं जात आहे. आम्हाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावं अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. यामुद्द्यावर मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. (Latest Marathi News)

मात्र  मनोज जरांगे पाटील  यांनी घेतलेल्या भूमिकेवर स्पष्टीकरण देण्याचे निर्देश आता उच्च न्यायालयाने दिले आहेत. मनोज जरांगे आणि मराठा आंदोलक समिती प्रस्तावित आंदोलन कसं करणार आहेत? आंदोलन हिंसक होणार नाही, याची जबाबदारी ते घेणार आहेत का?

High Court Notice on Manoj Jarange Patil
Manoj Jarange news : मनोज जरांगेंच्या सहकाऱ्याच्या कारची तोडफोड, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही याची जबाबदारी घेणार का? या सर्व मुद्यांवर मनोज जरांगे यांनी 26 फेब्रुवारीपर्यंत भूमिका स्पष्ट करा, असं निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे. आमचं आंदोलन हे शांततापूर्वकच असेल, असं मनोज जरांगे यांच्या वकिलांची उच्च न्यायालयात हमी दिली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कसं असेल मनोज जरांगे यांचं आंदोलन?

मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मान्य करण्यासाठी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. येत्या २४ फेब्रुवारीपासून दररोज राज्यातील प्रत्येक गावात एकाचवेळी रास्तारोको आंदोलन करण्यात येईल. आंदोलन हिंसक होऊ द्यायचं नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

High Court Notice on Manoj Jarange Patil
Maharashtra Politics: राष्ट्रवादीला ४-५ जागाच मिळतील; महायुतीचा लोकसभा जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असेल? विजय वडेट्टीवार यांनी सविस्तर सांगितलं

त्यानंतर १ मार्च २०२४ पासून राज्यातील वृद्ध महिला व पुरुष यांनी आमरण उपोषणाला बसायचे आहे. आंदोलनात कुणाची जीव गेला तर त्यासाठी सरकार जबाबदार असेल. त्यानंतर ३ मार्चला संपूर्ण राज्यात जिल्ह्याच्या वतीने एकाच ठिकाणी एकच रास्ता रोको करायचा, असं मनोज जरांगे यांनी सांगितलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com