Lok Sabha 2024 Saam Tv
देश विदेश

Lok Sabha 2024: भाजप सरकारी यंत्रणेवर दबाव आणून लोकशाही लुटतंय; राहुल गांधींचा गंभीर आरोप

Rahul Gandhi Akhilesh Yadav Criticized BJP: राहुल गांधी यांनी त्यांच्या X या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये १ तरूण ८ वेळा मतदान केल्याचा दावा करत आहे. यावरून राहुल गांधींनी भाजपवर खळबळजनक आरोप केले आहेत.

Rohini Gudaghe

प्रमोद जगताप, साम टीव्ही नवी दिल्ली

देशभरात चार टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. आज पाचव्या टप्प्यातील मतदान होत आहे. या रणधुमाळीमध्ये कॉंग्रस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या X या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमधील तरूण ८ वेळा मतदान केल्याचा दावा करत आहे. यावरून राहुल गांधींनी भाजपवर सडकून टीका केली आहे.

हा व्हिडिओ राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे. यावरून त्यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजप सरकारी यंत्रणेवर दबाव आणत असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला (Lok Sabha 2024) आहे. देशातील लोकशाही लुटायची असल्याचं देखील राहुल गांधींनी त्यांच्या X पोस्टमध्ये म्हटलं आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव ( Akhilesh Yadav) यांनी ईव्हीएमवर मतदान करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील एटामधील असल्याचं सांगितलं जात आहे. यात एक तरुण ८ वेळा मतदान केल्याचा दावा करत आहे. यावरून आपला पराभव समोर पाहून भाजपला जनादेश नाकारण्यासाठी सरकारी यंत्रणेवर दबाव आणून लोकशाही लुटायची आहे, अशी टीका राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केली आहे.

सोबतच, निवडणुकीचे कर्तव्य बजावणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी सत्तेच्या दबावाला सामोरे जाताना आपली घटनात्मक जबाबदारी विसरू नये, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे. इंडिया आघाडीचं सरकार स्थापन होताच, अशी कारवाई केली जाईल की भविष्यात कोणीही 'संविधानाच्या शपथेचा' अवमान करण्यापूर्वी १० वेळा विचार करेल, असा इशाराही राहुल गांधींनी दिला आहे. हा व्हिडिओ (BJP) शेअर करत अनेक नेत्यांनी भाजपवर टीका केली आहे. जर निवडणूक आयोगाला हे चुकीचे वाटत असेल तर त्यांनी कारवाई करावी, अशी मागणी अखिलेश यादव यांनी केली आहे. भाजपची बूथ कमिटी ही लूट कमिटी असल्यातचं म्हणत त्यांनी टीका केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: १५०० आले, २१०० येणार, आता वडापाव घ्या; ट्रेनमध्ये लाडक्या भावाची मार्केटिंग; VIDEO

Maharashtra Live News Update: रायगडमध्ये अतीवृष्टीचा बळी

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! डान्स अन् अभिनयाची आवड जोपासत केली UPSC क्रॅक; IPS श्रृती अग्रवाल यांचा प्रेरणादायी प्रवास

Wednesday Horoscope : दिवसभरात आर्थिक चणचण भासणार, प्रेमामध्ये अपयश मिळणार; ५ राशींच्या लोकांचं टेन्शन वाढणार

Gajkesri Rajyog 2025: 22 जुलैला बनणार पॉवरफुल गजकेसरी राजयोग; 'या' ३ राशींना मिळणार पैसाच पैसा

SCROLL FOR NEXT