Rahul Gandhi: मोस्ट इलिजिबल बॅचलर विवाहबंधनात अडकणार? रायबरेलीकरांच्या आग्रहानंतर राहुल गांधींची लगीनघाई

National News In Marathi: सलमान खाननंतर देशातला मोस्ट इलिजिबल बॅचलर म्हणजे राहुल गांधी आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. राहुल गांधींच्या लग्नाची चर्चा नेहमीच रंगत असते.
Rahul Gandhi on marriage plans
Rahul Gandhi on marriage plansSaam Tv

Rahul Gandhi on marriage plans:

>> विनोद पाटील

सलमान खाननंतर देशातला मोस्ट इलिजिबल बॅचलर म्हणजे राहुल गांधी आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. राहुल गांधींच्या लग्नाची चर्चा नेहमीच रंगत असते. सध्या राहुल गांधी लोकसभा निवडणुक प्रचाराच्या धामधुमीत आहेत. देशभर त्यांच्या जोरदार प्रचारसभा सुरू आहेत.

अशाच एका प्रचारसभेत राहूल गांधींना एकानं प्रश्न विचारला आणि राहुल गांधींनीही बिनधास्तपणे त्याचं उत्तर दिलं. त्याचं झालं असं की, राहुल गांधी पहिल्यांदाच आपल्या आईच्या म्हणजेच सोनिया गांधींच्या रायबरेली या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. यासाठी राहुल गांधींनी रायबरेलीत प्रचारसभा घेतली. मात्र या सभेत राहुल गांधींना मोठ्या यक्ष प्रश्नाला सामोरं जावं लागलं.

Rahul Gandhi on marriage plans
S. Jaishankar: लोकसभा निवडणुकीत विदेशी संस्थांचा हस्तक्षेप, परराष्ट्र मंत्री स्पष्टच बोलले; 'वॉर रुकवा दी पापा'वरील टीकेलाही कडक उत्तर

रायबरेलीत प्रचारसभा सुरु असताना एका तरुणानं त्यांना प्रश्न विचारला की, अल्फा लावा....शादी कब करोगे? याचं राहुल गांधींची उत्तर देण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांची बहिण प्रियंका गांधी माईकसमोर आल्या आणि त्यांनी मोठ्या मिश्कीलपणे राहुल गांधींना उत्तर देण्याचा आग्रह केला. मग राहुल गांधींनीही आपल्या बहिणीच्या आग्रहाखातर बिनधास्तपणे उत्तर दिलं. ते म्हणाले की, लवकरच करणार.

केवळ रायबरेलीतल्या जनतेलाच राहुल गांधींच्या लग्नाची घाई झालेली नाही, तर इंडिया आघाडीतल्या मित्र पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनाही राहु गांधींच्या लग्नाचे वेध लागलेले आहेत. याआधी आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांनीही राहुल गांधी यांना लग्न कधी करणार असं विचारलं होतं.

Rahul Gandhi on marriage plans
Maharashtra Politics: शिरूर लोकसभेत मतदारांच्या मतांची किंमत ५०० रुपये, कोल्हेंनी VIDEO शेअर करत केला गंभीर आरोप

राहुल गांधी यांनी याआधी जेव्हा दिल्लीतील करोल बाग येथे मोटारसायकल मॅकॅनिकनशी संवाद साधला. त्यावेळी राहुल गांधींना त्यानं लग्नाबाबत प्रश्न विचारला होता. त्यानंतर सोनीपतच्या महिला शेतकऱ्यांनीही हाच प्रश्न विचारला होता. देशातल्या सर्वांनाच राहुल गांधींच्या लग्नाची घाई झालीय. मात्र राहुल गांधींनी पहिल्यांदाच जाहीरपणे या प्रश्नाला सकारात्मक उत्तर दिलंय. त्यामुळे देशातल्या जनतेला 4 जूनच्या निकालाची जेवढी उत्सुकता लागलीय तेवढीच राहुल गांधींच्या लग्नाचीही लागली असणार.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com