Bharat Ratna Award Winners List Saam TV
देश विदेश

Bharat Ratna Award: मोदी सरकारच्या काळात कुणाकुणाला मिळाला भारतरत्न पुरस्कार? संपूर्ण यादीच आली समोर...

Bharat Ratna Award Winners: मोदी सरकारने आपल्या १० वर्षांच्या कार्यकाळात दोन नव्हे तर दहा व्यक्तींना भारतरत्न देण्याची घोषणा केली आहे. चला तर मग पाहूया संपूर्ण यादी.

Satish Daud

Bharat Ratna Award List

भारताचे माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि डॉक्टर एमएस स्वामिनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर (पूर्वीचे ट्वीटर) फोटो शेअर करत याबाबतची माहिती दिली. यापूर्वी मोदी सरकारने भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला होता. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्याआधी बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि ओबीसी आरक्षणाचे प्रणेते कर्पूरी ठाकूर यांचा देखील भारतरत्न पुरस्काराने सन्मान करणार असल्याचं मोदी सरकारने म्हटलं होतं. दरम्यान, मोदी सरकारने आपल्या १० वर्षांच्या कार्यकाळात दोन नव्हे तर दहा व्यक्तींना भारतरत्न देण्याची घोषणा केली आहे. चला तर मग पाहूया संपूर्ण यादी.

मोदींच्या काळात कुणाकुणाला मिळाला भारतरत्न?

  • माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव - 2024

  • माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह - 2024

  • एमएस स्वामीनाथन - 2024

  • लालकृष्ण अडवाणी - 2024

  • कर्पूरी ठाकूर - 2024

  • नानाजी देशमुख - 2024

  • भूकेंद्र कुमार - 2024

  • प्रणव मुखर्जी- 2019

  • पंडित मदन मोहन मालवीय- 2015

  • अटल बिहारी वाजपेयी- 2015

भारतरत्न पुरस्कार कुणाला दिला जातो?

भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. याची स्थापना 1954 साली करण्यात आली होती. देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या भारताची कीर्ती जगभरात वृद्धीगंत करणाऱ्या व्यक्तीस या पुरस्काराने गौरवण्यात येतं.

अनेकांना तर हा सन्मान मरणोत्तर दिला गेला आहे. सन 2019 पर्यंत भारतात 48 जणांना भारतरत्न देण्यात आले आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात जाहीर करण्यात आलेल्या 5 लोकांची नावे जोडली तर त्यांची संख्या 53 होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WTC Points Table: भारताच्या विजयानंतर पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; पाहा भारत कोणत्या स्थानावर?

Maharashtra Live News Update : विठुरायाच्या दर्शनासाठी रांगेत उभा असलेल्या भाविकाला सुरक्षा रक्षकाची काठीने बेदम मारहाण

Eye Infection: पावसाळ्यात डोळ्यांना संसर्ग होण्यापासून सुरक्षित ठेवा, जाणून घ्या महत्वाच्या सोप्या टिप्स

Ladki Bahin Yojana: वेळेवर ₹१५०० मिळत नाहीत, लाडकी बहीण योजना बंद करा, राज्यातील महिलांची मागणी

Mumbai Metro: घाटकोपर ते वर्सोवा मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड, प्रवाशांचे प्रचंड हाल; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT