MESSI EVENT CHAOS IN KOLKATA: BENGAL SPORTS MINISTER ARUP BISWAS RESIGNS Saam Tv
देश विदेश

क्रीडामंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा, मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटले?

Bengal Sports Minister Resigned After Messi Event: कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियममध्ये लिओनेल मेसीच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या गोंधळानंतर पश्चिम बंगालचे क्रीडामंत्री अरूप बिस्वास यांनी पदाचा राजीनामा दिला.

Omkar Sonawane

अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेसीच्या कार्यक्रमादरम्यान कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियममध्ये झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालचे क्रीडामंत्री अरूप बिस्वास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून, या प्रकरणाची निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी व्हावी यासाठी क्रीडा विभागाच्या जबाबदाऱ्यांतून मुक्त करण्याची विनंती केली आहे.

स्टेडियममध्ये चाहत्यांचा संताप, तोडफोड

शनिवार (13 डिसेंबर 2025) रोजी सॉल्ट लेक स्टेडियममध्ये मेसींची झलक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने चाहते जमले होते. अनेकांनी यासाठी महागडी तिकिटे खरेदी केली होती. मात्र मेसी स्टेडियममध्ये पोहोचल्यानंतर राजकीय नेते, पोलीस अधिकारी आणि इतर व्हीआयपी यांच्या गर्दीमुळे त्यांच्याभोवती एक कवच तयार झाले. त्यामुळे सामान्य प्रेक्षकांना मेसींची झलकही मिळाली नाही. यामुळे संतप्त चाहत्यांनी स्टेडियममध्ये तोडफोड केली.

परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर पोलिसांना मोठ्या प्रमाणावर लाठीचार्ज करावा लागला. व्यवस्था सुरळीत करण्यासाठी रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स (RAF) तैनात करण्यात आली. या गोंधळानंतर मेसी ठरलेल्या वेळेआधीच स्टेडियममधून निघून गेले. या प्रकरणात कार्यक्रमाचे मुख्य आयोजक शताद्रु दत्ता यांना अटक करण्यात आली आहे. तिकिटांच्या जादा किमती आणि फुटबॉल आयकॉनपर्यंत मर्यादित प्रवेश यामुळे हा गोंधळ झाल्याचा आरोप आहे.

SIT ची स्थापना

सॉल्ट लेक स्टेडियममधील तोडफोडीच्या चौकशीसाठी चार सदस्यीय विशेष तपास पथक (SIT) गठित करण्यात आले आहे. पश्चिम बंगालचे मुख्य सचिव मनोज पंत यांनी वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश असलेली SIT नेमली आहे.

कर्तव्यातील हलगर्जीपणाबद्दल डीसीपी बिधाननगर अनीश सरकार यांना निलंबित करण्यात आले असून त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच क्रीडा सचिव राजेश कुमार सिन्हा यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, तर सॉल्ट लेक स्टेडियमचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. के. नंदन यांचे पद काढून घेण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी, सावकारानेच दिला किडनी विकण्याचा सल्ला

महाविकास आघाडीत बिघाडी, ठाकरे बंधूंच्या युतीवर शिक्कामोर्तब

Poco C85 5G Launch: 50 मेगापिक्‍सल ड्युअल-कॅमेरा, 6000 mh बॅटरी; बाजारात पोकोचा धाकड सी 85 फोन लॉंच

Maharashtra Live News Update: पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे अजित पवार यांच्या भेटीला

Face care: डाग आणि पिग्मेंटेशन कमी करुन ग्लोईंग चेहरा हवाय; मग रात्री झोपताना घरी तयार केलेलं 'हे' होममेड सीरम नक्की लावा

SCROLL FOR NEXT