आनंदाची बातमी! ब्रिटनमधील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले Saam Tv
देश विदेश

आनंदाची बातमी! ब्रिटनमधील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले

ब्रिटनमधील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लंडन- कोरोना महामारीने थैमान काय आजून देखील थांबलेले नाही. तरीही ब्रिटन मध्ये नागरिकांना दिलासा देण्यात आला आहे. आजपासून ब्रिटनमध्ये कोरोना निर्बंध हटवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे दोन्ही लस घेतलेल्या, नागरिकांना मास्क न लावण्याची सवलत देण्यात आले आहे. खास करून, म्हणजे ब्रिटनमधील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. Lifted all restrictions corona Britaindvj97

देशामध्ये ५० हजारांच्या जवळपास कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. असे असताना देखील पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी हे निर्बंध हटवत असल्याचे जाहीर केले आहे. AFP च्या अहवालानुसार एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. ब्रिटनमध्ये मागील अनेक महिन्यांपासून कोरोना निर्बंध लावण्यात आले होते. तसेच लॉकडाऊनचा कालावधी अनेक वेळा वाढवला होता.

हे देखील पहा-

याचे विपरीत परिणाम हे अर्थव्यवस्थेवर पडत असल्याचे दिसून येत होते. याशिवाय लोकांमधून संतापाची भावना दाटू लागली होती. ब्रिटनमध्ये रुग्णसंख्या वाढत असली, तरी मृत्यदर मात्र कमी प्रमाणात आहे. जास्तीत जास्त प्रमाणात लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. लोकांना आतापासून कोरोना विषाणूबरोबर जगण्यास शिकायला हवे असे बोरिस जॉन्सन यांनी म्हणाले आहे. अखेर त्यांनी लोकांना या कोरोना संकटात दिलासा दिला आहे. Lifted all restrictions corona Britaindvj97

एका मोठ्या लोकसंख्येला ब्रिटनमधील लशीचा डोस मिळाला आहे. लसीकरणाने मृत्यूदर प्रमाण कमी झाले आहे. कोरोना सध्या सर्दी- तापासारखा असल्याची भावना रुजवत आहे. यामुळे ब्रिटनने कोरोना निर्बंध हटवण्याचा निर्णय हाती घेतला आहे. देशामधील नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत देखील केले आहे. सर्व प्रौढांना ३१ जुलै पर्यंत लस देण्याचे या ठिकाणी असलेल्या, सरकारचे महत्वाचे उद्दिष्टे वेळेआधी आजच पूर्ण करण्यात आले आहे.

सरकारच्या या योगदानाबद्दल ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी याबद्दल आनंद व्यक्त केले आहे. पंतप्रधान जॉन्सन यांनी ३१ जुलैपर्यंत देशामधील प्रत्येक प्रौढ व्यक्तीला कोरोना प्रतिबंधक लसींचा किमान १ तरी डोस देण्याचे, आणि तसेच आजपर्यंत किमान २ तृतियांश प्रौढांना २ डोस देण्याचे लक्ष्य आरोग्य यंत्रणेच्या समोर ठेवण्यात आले आहे. ही २ उद्दिष्टे वेळेआधी साध्य करण्यात आली आहेत. Lifted all restrictions corona Britaindvj97

आज ब्रिटनमधील सरकारने सर्व निर्बंध हटवले आहे. फ्रिडम डे च्या पार्श्वभूमीवर मिळालेले हे यश महत्त्वाचे मानले जाणार आहे. ब्रिटनमध्ये ८ महिन्यांपूर्वी लसीकरण मोहिम सुरु करण्यात आली होती. यानंतर अत्यंत नियोजनबद्ध त्याची संपूर्ण अंमलबजावणी करण्यात आली आहे. जॉन्सन यांनी जनतेचे आभार मानताना आता उर्वरित जणांनीही लवकरच लस घ्यावी, असे आवाहन यावेळी त्यांनी केले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Pune Couple Video: दुचाकीवर प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे; प्रेमीयुगुलांचा व्हिडिओ व्हायरल

Govt Officials Caught In Bar: शासन 'बार'च्या दारी ; बिअरबारमध्ये सरकारी काम, उपराजधानीतल्या कारभारावरुन हल्लाबोल

Pune Rave Party: पोलिसांनीच कोकेन ठेवलं; 'दृश्यम'प्रमाणे चित्र रंगवलं अन् व्हिडीओ बनवला, असीम सरोदेंचा दावा

Nag Panchami Wishes 2025 : नागपंचमीनिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या भक्तीमय शुभेच्छा

Divya Deshmukh : गँडमास्टर दिव्या देशमुखचं फडणवीसांकडून कौतुक, व्हिडीओ कॉलद्वारे दिल्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT