Leopard Attack viral video saam tv
देश विदेश

भरधाव वेगानं जाणाऱ्या दुचाकीला ओव्हरटेक, बिबट्यानं दोघांवर हल्ला चढवला, काळजाचा थरकाप उडवणारा Viral Video

काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नरेश शेंडे

रस्त्यावरून प्रवास करताना काय घडेलं याचा काही नेम राहिला नाही. भर रस्त्यात जंगली वन्य प्राण्यांचे वाहनचालकांवर होणारे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. गवा,वाघ, बिबट्या सारख्या प्राण्यांनी तर माणसांवर हल्ले करण्याचा ठाम निर्धारच केला आहे. वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीत मुक्तसंचार वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या काळजाचा थरकाप उडेल. (leopard attack on bike rider and another person mysore viral video)

नेमकं काय घडलं ?

एका बिबट्यानं म्हैसूर येथील एका मानवी वस्तीत प्रवेश करून एका दुचाकी चालकावर हल्ला केला. रस्त्यावरून भरधाव वेगानं जाणाऱ्या या दुचाकीला काही सेकंदातच बिबट्यानं ओव्हरटेक केला. त्यानंतर भर रस्त्यात (Leopard Attack) चालकाला बिबट्याने खाली पाडल. चालकावर हल्ला करत असताना रस्त्याच्या समोर असणाऱ्या एका व्यक्तीनं बिबट्यावर दगड फेकला. मात्र, रागाने फणफणलेल्या बिबट्यानं त्याच्यावरही हल्ला चढवला.दुचाकी चालकाला खाली पाडल्यानंतर बिबट्यानं दगड फेकणाऱ्या व्यक्तीच्या नाकी नऊ आणले. त्यानंतर बिबट्यान धूम ठोकली.

हा थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियाच्या ट्विटर हॅंडलवर आयएफएस अधिकारी सुसांत नंदा यांनी शेअर केला आहे. ही घटना म्हैसून येथील असल्याचं त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. हजारो नेटकऱ्यांनी या व्हिडिओला लाईक केलं आहे.या व्हिडिओला कमेंट करत एका नेटकऱ्यानं म्हटलं, बिबट्याच्या आधी गर्दीवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. तर दुसऱ्या एका युजरने म्हटलं, अशा घटनांना लोक जबाबदार असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रोहिणी खडसे घेणार पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट

Hindi Sakti : हिंदी सक्तीविरोधात शालेय अभ्यासक्रमात मोठे बदल | VIDEO

Weight loss tips : आता वजन कमी करण्यासाठी व्यायामाची गरज नाही, फक्त या ३ गोष्टी लक्षात ठेवा

Pune Rave Party: खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात मोठी अपडेट, त्याच सूटमध्ये २४ तास आधीही रंगली होती पार्टी

नवऱ्याला रेव्ह पार्टीत बेड्या, २४ तासानंतर रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया, दोन ओळीत विषय संपवला

SCROLL FOR NEXT