EWS Reservation : सुप्रीम कोर्टाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

सुप्रीम कोर्टाने आज आर्थिक दुर्बल घटकांना मोठा दिलासा दिला. नोकरी आणि प्रवेशांसाठी देण्यात आलेलं १० टक्के आरक्षण कोर्टाने वैध ठरवलं.
Maharashtra CM Eknath Shinde News
Maharashtra CM Eknath Shinde NewsSaam TV
Published On

EWS Reservation : सुप्रीम कोर्टाने आज आर्थिक दुर्बल घटकांना मोठा दिलासा दिला. नोकरी आणि प्रवेशांसाठी देण्यात आलेलं १० टक्के आरक्षण कोर्टाने वैध ठरवलं. घटना दुरुस्तीच्या माध्यमातून करण्यात आलेली आरक्षणाची ही तरतूद वैध असल्याचा म्हणत सुप्रीम कोर्टाने EWS आरक्षणाविरोधातील याचिका फेटाळून लावल्या. दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. (Eknath Shinde Latest News)

Maharashtra CM Eknath Shinde News
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ रुग्णालयात दाखल; काय आहे कारण?

सर्वोच्च न्यायालयाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण देण्यासंदर्भामध्ये आज जो निर्णय दिला आहे, त्याचे मी मनापासून स्वागत करतो. सर्व जाती-धर्मांतील गरीब आणि दुर्बल घटकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. आज सर्वोच्च न्यायालयात या संदर्भातला निर्णय हा गोरगरिबांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. असेही शिंदे म्हणाले.

गिरीष महाजन यांनीही केलं स्वागत

सुप्रीम कोर्टाच्या या ऐतिहासिक निर्णयाचं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा स्वागत केलं आहे. आर्थिक दृष्ट्या जे दुरबल आहेत त्यांना आधार मिळाला पाहिजे, काही लोक असे आहेत ज्यांना जातीचे आरक्षण मिळत नाही. त्यामुळे अशा लोकांचा आर्थिक स्थर वाढवा म्हणून हा निर्णय योग्य आहे. आम्ही त्याचे स्वागत करतो. मोदींनी जो निर्णय घेतला होता, त्याला त्यावर आज कोर्टाने शिक्कामोर्तब केलं. असं गिरीष महाजन म्हणाले.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com