Mp Kangana Ranaut 
देश विदेश

Paris Olympics: “सेक्स बेडरुमपर्यंत मर्यादित का राहू शकत नाही?” खासदार कंगना रणौतांची ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यावर टीका

Mp Kangana Ranaut : अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत यांनी पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यावर टीका केलीय.

Bharat Jadhav

अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत परखड मत मांडण्यापासून कधीच घाबरत नाही. त्या नेहमीच विविध घटनांवर आपलं मत मांडत असतात. भल्या विधानामुळे वाद जरी निर्माण झाले तरी त्या आपले विचार सार्वजनिक करत असतात. आता खासदार कंगना रणौत यांनी पॅरिसमधील ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यावर वादग्रस्त विधान केलंय.

जगाचं लक्ष लागून राहिलेल्या पॅरिस ऑलिम्पिकच्या क्रीडा उत्सवाच्या पहिल्यावहिल्या तरंगत्या उद्घाटन सोहळ्याला सेन नदीच्या पात्रात सुरुवात झाली. साधारण ५ लाख प्रेक्षकांच्या उपस्थितीत भव्यदिव्य उद्घाटन सोहळा पार पडला. मात्र इतका भव्यदिव्य झालेला उद्घाटन सोहळा आता वादग्रस्त ठरलाय. कार्यक्रमातील बीभत्स प्रकारांमुळे अनेकांनी संताप व्यक्त केलाय. यावरून खासदार कंगना रणौत यांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टवरून टीका केलीय.

पॅरिस ऑलम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात अति लैंगिक कृत्ये दाखवण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. यासाठी लहान मुलांचाही वापर करण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात येतोय. ड्रॅग क्विनद्वारे दि लास्ट सपरची प्रतिकृती तयार केल्याचा दावा करत ख्रिश्चन समाजाच्या भावना दुखावल्याचाही आरोप केला जातोय. कंगना रणौत यांनीही यावरून टीका केलीय.

“द लास्ट सपरच्या अति-लैंगिक, निंदनीय सादरीकरणामध्ये एका लहान मुलाचा समावेश केल्याबद्दल पॅरिस ऑलिम्पिकवर टीका केली जातेय. ड्रॅग क्वीनच्या सादरीकरणादरम्यान एक लहान मुलाचाही समावेश असल्याचं दिसत आहे. त्यांनी येशूच्या रूपात निळ्या रंगात रंगवलेला एक नग्न माणूस देखील दाखवलाय. त्यावरुन ख्रिश्चन समाजाचा अपमान केलाय. डाव्या विचारसरणीच्या लोकांनी २०२४ चे ऑलिम्पिक पूर्णपणे हायजॅक केलं आहे”, असं कंगना रणौत म्हणाल्यात.

उद्घाटन समारंभातील आणखी एक फोटो शेअर करून त्यांनी म्हटलंय की हा कार्यक्रम समलैंगिकतेवर आधारीत होता. “ऑलिम्पिकच्या उद्घाटन कार्यक्रमात सर्वकाही समलैंगिकतेशी संबंधित होते. मी समलैंगिकतेच्या विरोधात नाही पण ऑलिम्पिकचा लैंगिकतेशी काय संबंध? खेळ आणि स्पर्धांमध्ये लैंगिकता का आणली जाते? सेक्स बेडरुमपर्यंत मर्यादित का राहू शकत नाही?” असा सवाल कंगना रणौत यांनी आपल्या इंस्टाग्राम पोस्टवरुन केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT