खासदार तसंच बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आता अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्या समर्थनात मैदानात उतरली आहे. कमला हॅरिस यांना कॉलगर्ल म्हणणाऱ्या अमेरिकी नेटकऱ्यांना कंगनाने चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. यावेळी अमेरिकी हे भारतीयांपेक्षा वाईट असल्याचे कंगनाने म्हटले आहे.
अमरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीतून(elections) जो बायडन यांनी माघार घेतली आहे. त्यानंतर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांच्या नावाची अमेरिकेत जोरदार चर्चा सुरु आहे. यावेळी त्यांच्यावरील व्हायरल मीम्समध्ये अमेरिकी नागरिकांनी अक्षरश: खालची पातळी गाठली आहे. एका मीममध्ये तर हॅरिस यांचे एक्स आणि सॅन फ्रॅन्सिकोचे माजी महापौर विली ब्राऊन यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करण्यात आलाय. त्यात कमला यांचा 'हाय एंड कॉल गर्ल' असा उल्लेख करण्यात आला आहे. यावर कंगना रनौत चांगलीच आक्रमक झाली.
कंगनाची इन्स्टाग्राम पोस्ट काय?
'जो बायडन यांनी माघार घेत, राष्ट्रध्यक्ष पदासाठी कमला हॅरिस यांना पाठिंबा दिला आहे, त्यामुळे समाज माध्यमांवर कमला हॅरिस यांच्यावरील मीम्सचा पाऊस पडतोय. मी कुणाचंही समर्थन करत नाही. पण एका जेष्ठ महिला(Women) नेत्या, ज्या कॅलिफोर्नियाच्या अटॉर्नी जनरल राहिल्या आहेत, त्यांनाही 'सेक्सिझम'चा सामना करावा लागतो, हे वाईट आहे. अमेरिकी लोक विचारांनी मॉडर्न आहेत हे मान्य, पण हेही म्हणावे लागेल, की अमेरिकी हे भारतीयांपेक्षाही वाईट आहेत'
विली ब्राउन यांना कमला हॅरिस 1990च्या दशकात डेट(date) करत होत्या अशी माहिती आहे. त्यावरुन व्हायरल होत असलेल्या मीम्सवर कंगना रोष व्यक्त केला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.