Goa Election Saam Tv
देश विदेश

Goa Elections: प्रचाराचे शेवटचे दोन दिवस उरले असताना गोव्यात दिग्गजांची हजेरी

आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि भाजप अध्यक्ष जे.पी नड्डा आज गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. तर पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेता आदित्य ठाकरे देखील गोव्यात आहेत.

वृत्तसंस्था

गोवा - गोवा निवडणुकीत प्रचाराचे शेवटचे दोन दिवस उरले असताना अनेक दिग्गज नेते गोव्याचा दौरा करत आहेत. गुरुवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गोव्यात सभा घेतली, त्यानंतर आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gnadhi) आणि भाजप अध्यक्ष जे.पी नड्डा आज गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. तर पर्यावरण मंत्री आणि शिवसेना (Shivsena) नेता आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) देखील गोव्यात आहेत. राहुल गांधी पत्रकार परिषद घेणार आहेत तर जे.पी.नड्डा सभा घेणार आहेत. तर आदित्य ठाकरे देखील गोव्यात (Goa) सभा आणि दारोदारी जाऊन प्रचार करणार आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचा हा तिसरा दौरा आहे. मागील दौऱ्यात गांधी यांनी घोरघरी जाऊन कॉंग्रेस उमेदवारांचा प्रचार केला होता.

हे देखील पहा -

दरम्यान, गोव्यातील राजकीय परिस्थिती पाहून परवा गोवा दौऱ्यावर आलेले अमित शहा यांनी आपला मुक्काम वाढवला आहे. रात्री परतायच्या ऐवजी सकाळ पर्यंत गोव्यात राहून त्यांनी परिस्थीतीचा आढावा घेतला. वॅार रुमला भेट देत त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. काल गोव्यात मोदींची सभा झाली. त्यामुळे जनतेचा कौल आपल्याबाजूने वळल्याचा दावा भाजप करत आहेत. मात्र दुसरीकडे गोव्यात भाजप साठी परिस्थीती बिघडत चालल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकूण परिस्थिती लक्षात घेता अमित शहा यांनी दौरा वाढवल्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Ticket: रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! यापुढे कन्फर्म तिकिटाची तारीख बदलू शकता, कधीपासून लागू होणार नवा नियम?

Mumbai To Goa: मुंबईवरुन गोव्याला जायचे आहे? मग जाणून घ्या प्रवास करताना कोणता मार्ग सर्वोत्तम

Air India: एअर इंडियाच्या फ्लाइट तिकीटावर ६००० रुपयांचा डिस्काउंट; कोणाला मिळणार फायदा?

Maharashtra Live News Update : विमानाचं तिकीट स्वस्त मिळावं यासाठी उड्डाण योजना- पीएम मोदी

PM Narendra Modi : मुंबईला मिळालं आणखी एक आंतरराष्ट्रीय विमानतळ; दि. बा. पाटील यांचं स्मरण करत PM मोदी काय म्हणाले? VIDEO

SCROLL FOR NEXT