देश विदेश

Lawrence Bishnoi: खासदार पप्पू यादव यांना जीवे मारण्याची धमकी; कॉलसाठी लॉरेंसने बंद केला होता तुरुंगातील जॅमर

Mp Pappu Yadav : बिहारच्या पूर्णिया येथील खासदार पप्पू यादव यांना कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या गुंडांनी जीवे मारण्याची धमकी दिलीय. लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने व्हॉईस मेसेज पाठवून ही धमकी दिलीय.

Bharat Jadhav

कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडून धमकी आल्यानंतर खासदार पप्पू यादव यांना आता जीवाची भीती वाटू लागलीय. पप्पू यादव हे बिहारमधील पूर्णियाचे लोकसभा खासदार आहेत. त्यांना आधीच Y श्रेणीची सुरक्षा आहे, मात्र धमकी आल्यानंतर त्यांनी आता Z श्रेणीत सुरक्षा करण्यात यावी, अशी मागणी केलीय. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या एका सदस्याने खासदार पप्पू यादव यांना ही धमकी दिलीय. धमकीचा कॉल करण्यासाठी लॉरेन्सच्या लोकांनी तुरुंगातील जॅमर बंद पाडला होता. कॉल चालू राहण्यासाठी एका तासासाठी १ लाख रुपये दिल्याची माहिती समोर आलीय.

दरम्यान लॉरेन्सकडून आलेली धमकी सार्वजनिक ऐकवत खासदार यादव यांनी सुरक्षा वाढवण्याची मागणी केलीय. मात्र बिहार सरकारकडून सुरक्षा दिली जात नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केलीय. खासदार पप्पू यादव यांनी लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीमधील सदस्याचा व्हॉईस मेसेज सार्वजनिक केलाय. या दोन मेसेजमध्ये धमकी देणारा पप्पू यादवला मोठा भाऊ म्हणून संबोधण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने जेलचा जॅमर दहा मिनिटांसाठी बंद केला.

यासाठी एका मिनिटाला एक लाख रुपये मोजावे लागल्याची माहिती समोर आलीय. टोळीचा सदस्य लॉरेन्स बिश्नोईशी बोलण्याचा प्रयत्न करतो. परंतु लॉरेन्सने त्याचा फोन घेतला नाही. त्यानंतर हा गुंड खासदार यांना म्हणाला की, माझ्यामुळे भाईने तुला जिवंत सोडलंय तरीही तुझा माज कमी होत नाहीये.

दहा मिनिटे जॅमर बंद

त्यानंतर हा गुंड पप्पू यादव यांना म्हणला की, दहा मिनिटांसाठी जॅमर बंद करण्यासाठी प्रति मिनिट १ लाख रुपये खर्च येतो. मग १० मिनिटे जॅमर बंद करण्याचा अर्थ तुम्हाला समजला की नाही, असा सवाल त्याने यादव यांना केला.

यानंतर, त्याच गुंडाचा दुसरा मेसेज आलाय. यामध्ये तो बोबडापणाने बोलत म्हणतो, त्याला यादव यांचा जीव वाचवायचा आहे. पण यादव ते समजत नाहीये. भाऊशी बोलून सांगितलं असतं की, माध्यमांनी क्लिप कापून चालवली. त्यात हे प्रकरण सर्व शांत झालं असतं. परंतु तुम्ही ऐकत नाहीत.

२०१९ मध्ये पप्पू यादवची सुरक्षा कमी करण्यात आली होती. आता त्यांनी सुरक्षा वाढवण्याची मागणी केलीय. या व्हॉइस मेसेजनंतर पप्पू यादवने केंद्रीय गृहमंत्रालयाकडे सुरक्षा वाढवण्यासाठी अर्ज केलाय. पप्पू यादवने आपल्या अर्जात म्हटले की, २०१५ मध्ये नेपाळच्या माओवाद्यांनी त्याच्यावर हल्ला केला होता. यानंतर त्याची सुरक्षा Y प्लसपर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र २०१९ मध्ये सुरक्षा कमी करण्यात आली होती. पण सध्याची परिस्थिती वेगळी आहे, सध्या त्यांच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलंय. गृहमंत्रालयाला हा धमकीचा व्हॉईस मेसेज पाठवताना त्यांनी आपली सुरक्षा झेड श्रेणीत वाढवावी, असे सांगितले.

पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांना तीन वेगवेगळ्या लोकांनी धमक्या दिल्यात. पप्पू यादव यांच्या म्हणण्यानुसार, मयंक सिंह नावाचा एका व्यक्तीने फेसबुक लाईव्हवरून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती त्यानंतर त्यांनी तत्काळ स्थानिक पोलिस आणि बिहार सरकारकडे तक्रार केली, परंतु याप्रकरणी कोणतीही कारवाई झाली नाही. दुबईतून धमकीचा फोनही आला होता.

लॉरेन्स बिश्नोईला दिलं होतं आव्हान

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पप्पू यादव यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लॉरेन्स बिश्नोईला आव्हान दिलं होत. देशातील कायदा आणि न्याय व्यवस्थेवर बंधने नसते तर लॉरेन्ससारख्या गुंडांचे नेटवर्क २४ तासांत उद्ध्वस्त केलं असतं. तुरुंगात बसून रस्त्यावरचा गुंड देशाच्या पोलीस यंत्रणेला भारी पाडत असल्याचंही ते म्हणाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT