Viral video Saam TV
देश विदेश

Viral video : ऐकावं ते नवलच! विष्ठेची क्षणात राख, हातही लावता येणार ; पाहा पाण्याशिवाय काम करणाऱ्या टॉयलेट सीटचा व्हिडिओ

टॉयलेट सीटमधून थोडा सुद्धा दुर्गंध येत नाही आणि आपल्याला सेतहून ही टॉयलेट सीट साफ देखील करावी लागत नाही.

Ruchika Jadhav

Potty Turning Ash : सध्याच्या युगात तंत्रज्ञान फार पुढे गेले आहे. माणसाने अनेक अद्भुत गोष्टींचे शोध लावले आहेत. मानवी बुद्धीचे यात कौतुक करावे तेवढे कमीच आहे. सध्या सोशल मीडियावर एक अनोखं टॉयलेट सीट चर्चेत आलं आहे. हे टॉयलेट सीट पण्यशिवय काम करत आहे. (Waterless Toilet)

ऐकून थोडं विचित्र वाटेल मात्र चकित करणारी गोष्ट म्हणजे या टॉयलेट सीटवर बसल्यानंतर त्यात जमा होणाऱ्या विष्ठेची चक्क राख होत आहे. आणखीन एक चकित करणारी बाब म्हणजे या टॉयलेट सीटमधून थोडा सुद्धा दुर्गंध येत नाही आणि आपल्याला ही टॉयलेट सीट साफ देखील करावी लागत नाही.

आजवर सांडपाण्याचा निचरा व्हावा यासाठी अनेक प्रयोग सुरू होते. अशात आता या टॉयलेट सीटमुळे हे काम शक्य झाले आहे. वॉशरूममधील या व्हिडिओमध्ये एक महिला या टॉयलेट सीट विषयी माहिती देताना दिसत आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, टॉयलेट सीटमध्ये तिने तिचे काम झाल्यावर फक्त एक बटण प्रेस केलं आहे. त्यानंतर अगदी एका क्षणात सर्व मलमूत्र खाली असलेल्या एका भांड्यात जमा होते आणि त्याची पूर्ण राख होते.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ आता खूप व्हायरल होत आहे. @Vanvies या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय. पर्यावरणासाठी पूरक असं या व्हिडिओला कॅपशन देण्यात आलं आहे. यामध्ये तुमचे मलमूत्र एक बटण दाबताच जळून खाक होते. येणाऱ्या काळात पाण्याचा गैरवापर टाळण्यासाठी अथवा ज्या ठिकाणी पाणी कमी प्रमाणात आहे त्या ठिकाणी या टॉयलेट सीटचा फार उपयोग होऊ शकतो.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ आणि यातील अनोखी टॉयलेट सीट पाहून सर्वच युजर्स चकित झाले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये या महिलेने आणखीन लिहिले आहे की, तुम्ही कधी कल्पना केली होती का की एक दिवस तुम्ही तुमच्या विष्ठेला जाळू शकाल, त्याची राख बनवून त्याला हात लावू शकाल आणि त्याचा कोणताही वास येणार नाही, असं महिलेने यात लिहिलं आहे. सध्या या टॉयलेट सीटची सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

SCROLL FOR NEXT