Gold Silver Price Saam Tv
देश विदेश

Gold Silver Price : खरेदीदारांसाठी सुर्वणसंधी! आठवड्याच्या पहिल्यादिवशी सोन्या-चांदीचे भाव स्थिर, तपासा आजचे दर

Gold Price In Maharashtra : मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातही भावात स्थिरेसह सुरु झाला आहे.

कोमल दामुद्रे

Sona Chandi Bhav : लग्नसराईचा मुहूर्त संपण्याच्या कालावधीत सोन्या-चांदीचे भाव स्थिर होते. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातही भावात स्थिरेसह सुरु झाला आहे. जर तुम्हाला सोनं-चांदी खरेदी करायचे असेल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे.

सराफ बाजारात (Market) 22 मे रोजी प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 57,650 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 60,530 रुपये, तर चांदीचा भाव 79,000 रुपये प्रति किलो आहे.

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचे सदस्य मनीष शर्मा यांनी सांगितले की, सोने आणि चांदीचे भाव स्थिर झाले आहे. आज चांदी (Silver) 79,000 रुपये प्रति किलो दराने विकली जाईल. तर काल (रविवारी)ही चांदीचा दरही तितकाच होता.

1. सोन्याचे भाव स्थिर:

मनीष शर्मा म्हणाले, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम भाव काल संध्याकाळी 57,650 रुपये होता.

काल 60,530 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने 24 कॅरेट सोने खरेदी केले. आजही त्याची किंमत 60,530 रुपये निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

2. 22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

3.  हॉलमार्कचे (Hallmark) सोनं कसे खरेदी कराल?

सोनं (Gold) खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कबुली

Maharashtra Live News Update: रायगडमध्ये अतीवृष्टीचा बळी

Badlapur Tourism : रिमझिम पावसात धबधब्याखाली चिंब भिजा, येणारा वीकेंड बदलापूरला प्लान करा

Pune : लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे पुण्यात निधन

Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलचे दर वाढले की कमी झाले? वाचा तुमच्या शहरातील आजचे नवे भाव

SCROLL FOR NEXT