Monday Horoscope : घाईगडबडीने निर्णय घेऊ नका; ५ राशींच्या लोकांची नैराश्य, कटकटीपासून होणार सुटका

Monday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांनी घाईगडबडीने निर्णय घेऊ नका. तर काहींची नैराश्य, कटकटीपासून सुटका होणार आहे.
Horoscope in Marathi
Horoscope Saam tv
Published On

पंचांग

सोमवार,२२ डिसेंबर २०२५,पौष शुक्लपक्ष.

तिथी-द्वितीया १०|५२

रास-धनु १०|०७ नं. मकर

नक्षत्र-उत्तराषाढा

योग-ध्रुव

करण-कौलव

दिनविशेष-शुभदिवस

मेष - द्रुतगती प्रवास होतील. वेगवान वाहने चालवायला आवडेल. लांबचे प्रवासाला जाल. तीर्थक्षेत्रि भेटी होतील. चांगल्या काही गोष्टी घडणारा आजचा दिवस आहे. यश आपलेच आहे हे ओळखून चला.

वृषभ - कष्ट करून धडपडून आपल्याला हवे ते मिळवावे लागेल. यामध्ये आपल्या लोकांची सुद्धा साथ मिळेल असे वाटत नाही. जोडीदाराकडून धनप्राप्तीचे योग आहेत. मृत्यू भय दाटेल.

मिथुन - संततीकडून विशेष पराक्रम आज घडेल. जे ठरवाल ते होईल. व्यवसायामध्ये आयोजन नियोजन आणि आपले निर्णय सकारात्मक आणि योग्य ठरतील. दिवस चांगल्या चार गोष्टी घेऊन आलेला आहे.

Horoscope in Marathi
Vastu Tips : श्रीमंतांच्या घरी 'या' वस्तूंनी होते भरभराट; जाणून घ्या काय सांगते वास्तुशास्त्र

कर्क - एखाद्याशी आपण किती आपलेपणाने वागलो तरी आपल्याला तशी समोरच्याकडून वागणूक मिळत नाही. आपली रस मुळातच हळवी आणि वात्सल्य पूर्ण आहे. मात्र आज थोडे खमकेपणे वागणे गरजेचे आहे. नाहीतर "ऊस मुळासकट खाल्ला जाईल "असे काहीसे वाटते आहे.

सिंह - आपला अहंकार बाजूला ठेवून कामे करायला लागतील. कलाक्षेत्र, क्रीडाक्षेत्र, राजकारण, उपासना, अध्यात्मक क्षेत्र सर्व ठिकाणी आज प्रगतीचे योग आहेत. इतरांना आपलेसे करण्यात आज तुम्ही यशस्वी व्हाल.

कन्या - आनंदाचे समीकरण आणि व्याख्या आज आपल्याला कळतील .घरी छोटे धार्मिक कार्य होतील. वाहन विकत घ्यायचं असेल तर दिवस चांगला आहे. नव्याने आनंदाच्या वाटा आयुष्यात येतील मातृसौख्य उत्तम .

Horoscope in Marathi
Vastu Tips For Home: वास्तुशास्त्रानुसार या शुभ वस्तू घरात ठेवा, हातात खेळता पैसा राहील

तूळ - "गरजेल तो बरसेल काय" असा काहीसा दिवस आहे. आपल्या मधली असणारी ताकत आज ओळखून येईल. न बोलता कामे कराल आणि दणदणीत यश मिळवाल.इतरांवर आपला प्रभाव राहील. जिद्द आणि चिकाटी कायम असेल.

वृश्चिक - व्यवसायामध्ये नव्या काही गोष्टी करण्यासाठी आजचा दिवस तितकाचा योग्य नाही. "धीर धरे धीरापोटी फळे रसाळ गोम" असा दिवस आहे. घाईगडबडीने निर्णय घेऊ नका. सध्या फक्त पैशाचे चलन चांगले आहे. त्यामधून गुंतवणुकीचा विचार करता येईल.

धनु - एक वेगळी लहर आणि उमेद आजचा दिवसात तुमच्याकडे असेल. दमणूक, कटकटी, नैराश्य या सर्व गोष्टी आज तुम्ही बाजूला ठेवा. आनंदाला पूर्णतेने स्वतःला स्वीकार करा. सकारात्मकता वाढेल.

Horoscope in Marathi
Vastu Tips : श्रीमंतांच्या घरी 'या' वस्तूंनी होते भरभराट; जाणून घ्या काय सांगते वास्तुशास्त्र

मकर - आपण करत असलेल्या गोष्टी स्वतः करत नसतो तर कुणीतरी दैवी शक्ती या मागे कार्य करते हे जाणवेल. मनासारखे घडले नाही तरी अध्यात्माची कास धरा. कारण वाईट गोष्टींना धरबंद आज तुम्ही घालूच शकणार नाही. स्वतःला बदला जग बदललेले दिसेल.

कुंभ - जितके काही आजपर्यंत पुण्य केले आहे त्याचे फळ आज तुम्हाला पदरात मिळेल.मग नाती असो पैसा असो व्यवहार असो किंवा स्वतः तील केलेली गुंतवणूक सुद्धा आज कामी येईल. दिवस चांगला आहे.

मीन - "केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे" असा दिवस आहे. खूप कामे कराल. खूप यश मिळवाल खूप सन्मान मिळतील. खूप आदर मिळेल. कशाचीच कमी नाही. आयुष्यात आलेल्या गोष्टीचे सार्थक होत आहे असा दिवस असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com