Chandrapur Civic Elections: चंद्रपुरात काँग्रेसचा मोठा विजय, किंगमेकर विजय वडेट्टीवारांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल

Vijay Wadettiwar Dance Viral: चंद्रपूर नगरपालिका निवडणुकीत भाजपला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेसच्या मोठ्या विजयानंतर विजय वडेट्टीवार यांनी जबरदस्त ठेका धरलाय. त्यांच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसनं भाजपचा दारुण पराभव केल्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. इतकेच नाही तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जबरदस्त डान्स केलाय. नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा दारुण पराभव करत जिल्ह्यात ११ पैकी ७ नगरपरिषदांवर विजय मिळवलाय. काँग्रेसच्या या मोठ्या यशात आमदार आणि विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार हे किंगमेकर ठरले. नगरपरिषद आणि नगरपालिकेत विजय मिळल्यानंतर मोठा जल्लोष करण्यात आला. काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरामध्ये गुलाल उधळत,फटाक्यांची आतषबाजी करत सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी विजय वडेवट्टीवार यांनी ढोल ताशाच्या तालावर ठेका धरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com