21-Year-Old Indian Driver Charged in Fatal DUI Accident Saam
देश विदेश

महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव ट्रकची ६ वाहनांना धडक, तिघांचा मृत्यू, थरकाप उडवणारा VIDEO समोर

21-Year-Old Indian Driver Charged in Fatal DUI Accident: दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये अपघाताचा थरार. ट्रक अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद.

Bhagyashree Kamble

  • दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये अपघाताचा थरार.

  • ट्रक अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.

  • ट्रक चालक दारूच्या नशेत असल्याची माहिती.

अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात तिघांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातासाठी अमेरिकेत बेकायदेशीररित्या वास्तव्यास असलेल्या २१ वर्षीय भारतीय तरूण जबाबदार असल्याचं पोलिसांना सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, तरूण दारूच्या नशेत ट्रक चालवत होता. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तरूणाला तात्काळ अटक केली आहे.

अपघात नेमका कसा घडला?

ही भीषण दुर्घटना सॅन बर्नार्डिनो काउंटी फ्रीवेवर घडली. जसप्रीत सिंगच्या सेमी ट्रकने इतर वाहनांना धडक दिली. ट्रकच्या डॅशकॅममध्ये या अपघाताचा व्हिडिओ रेकॉर्ड झाला असून, त्यात ट्रक एका एसयूव्हीला धडक देताना स्पष्टपणे दिसत आहे. या धडकेत तीन जणांचा मृत्यू झाला तर, काहींना गंभीर दुखापत झाली आहे.

दारूच्या नशेत होता वाहनचालक

पोलिसांच्या तपासात असे उघड झाले की, जसप्रीतने अपघाताच्यावेळी ब्रेक लावले नव्हते. तरूण ड्रग्जच्या नशेत वाहन चालवत होता, असं पोलिसांनी सांगितलं. अपघातानंतर त्याला तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय तपासणीत तो पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती मिळाली, असे कॅलिफोर्निया हायवे पेट्रोल अधिकारी रॉड्रिगो जिमेनेझ यांनी सांगितले.

अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाने (DHS) सांगितले की, जसप्रीत सिंगकडे कोणताही वैध इमिग्रेशन स्टेटस नाही. तो २०२२ मध्ये बेकायदेशीर पद्धतीने ओलांडून अमेरिकेत दाखल झाला होता. त्यानंतर नजरबंदी धोरणांतर्गत तरूणाची सुटका करण्यात आली होती. आता त्याच्या अटकेनंतर यूएस इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) ने त्याच्याविरुद्ध इमिग्रेशन डिटेनर जारी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nightclub Fire : गोव्यात नाईटक्लबमध्ये अग्नितांडव, २३ जणांचा होरपळून मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

'तेरे बाप की जगह है क्या! एकमेकींचा बाप काढत ओढल्या झिपऱ्या; अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटीत पोरींचा तुफान राडा |Video Viral

Raigad Tala Fort: रायगडमध्ये तळगडावर सापडला गुप्त दरवाजा|Video Viral

Maharashtra Live News Update: पुणे भाजपच्या कोअर टीमची रविवारी बैठक

Beed Crime: बीडमधील गुंडाराजला पोलिसांची साथ? गावगुंडांकडून ग्रामरोजगार सेवकाला जबर मारहाण; दोन्ही पाय मोडले, दुचाकीला बांधून ओढलं

SCROLL FOR NEXT