Uttarakhand: उत्तराखंडच्या जोशीमठाजवळ भुस्खलन झाल्याची मोठी घटना घडली आहे. या घटनेमुळे बद्रीनाथ महामार्ग बंद करण्यात आला आहे. या घटनेत आतापर्यंत एका जणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडच्या जोशीमठाजवळील हेलांग खोऱ्यात भूस्खलनाची घटना घडली. या दुर्घटनेनंतर बद्रीनाथ महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे. जोशीमठाजवळील हेलंग खोऱ्यात हायड्रो पॉवर प्रक्रलापासाठी एनटीपीसीसाठी बोगदा बांधला जात आहे.
काल बांधकाम सुरू असताना स्फोट झाला. त्यानंतर डोंगराचा एक भाग तुटून रस्त्यावर पडला, असा दावा केला जात आहे.
दरड कोसळल्यानंतर चारधाम यात्रा थांबविण्यात आली आहे. महामार्गावरून येणाऱ्या यात्रेकरूंना अडवण्यात आलं आहे.महामार्गावर भूस्खलनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
प्रवासी मार्गात अडकून पडले आहेत. ढिगाऱ्याखाली सापडल्याने कारमधून प्रवास करणारे चंदीगड येथील दोन प्रवासी जखमी झाले आहेत. तर त्याचवेळी हनुमान चाटी येथे डोंगरावरून दगड पडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
महामार्गावर भूस्खलन झाल्यामुळे रस्त्यावर वाहतूककोंडी झाली. त्यानंतर आता वाहतूक सूरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. रसत्यावरील ढिगारा हटविण्याचे प्रयत्न सूरू आहेत. रात्रीपर्यंत महामार्ग सुरळीत होणार आहे. यात्रेकरूंनी प्रवासाचे अपडेट मिळताच प्रवासाला सुरुवात करावी, असे आवाहन एसपी चमोली प्रमेंद्र डोवाल यांनी केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.