Manipur Violence News: मणिपूरमधील हिंसाचार भडकला; परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी निमलष्करी दलाला दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश

मेईतेई समुदाय आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने परिस्थिती चिघळली आहे.
Manipur
Manipur Saam TV

Manipur Violence : मणिपूरमधील परिस्थिती दिवसेदिवस चिघळत आहे. हिंसाचारानंतर परिस्थिती सामान्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. इम्फाळ आणि सिसपूरमध्ये परिस्थिती हाताबाहेर गेली असून तिथे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मेईतेई समुदाय आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने परिस्थिती चिघळली आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून मणिपूरमध्ये अतिरिक्त सैन्याची तैनाती सुरू राहणार आहे. मणिपूरमधील हिंसाचाराची बिघडलेली परिस्थिती पाहून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. आणीबाणीच्या स्थितीत दंगलखोरांना दिसता क्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश राज्य सरकारकडून सुरक्षा दलांना देण्यात आले आहेत.

फेक व्हिडीओ व्हायरल

हिंसाचारादरम्यान अनेक फेक व्हिडीओ देखील व्हायरल केले जात आहेत. फेक व्हिडिओंमध्ये आसाम रायफल्सच्या पोस्टवरील हल्ल्याचा व्हिडिओचा देखील समावेश आहे, जो हिंसाचार वाढवण्यासाठी व्हायरल केला जात आहे. (Latest Marathi News)

Manipur
UP STF killed Gangster: उत्तर प्रदेशात आणखी एका गँगस्टरचं एन्काउंटर! मेरठमध्ये STF सोबत चकमकीत कुख्यात गुंड ठार

घरे, दुकाने आणि धार्मिक स्थळे जाळली

लष्कराने नागरिकांना आवाहन केले आहे की, केवळ अधिकृत आणि वेरिफाईड सोर्सकडून आलेल्या बातम्यांवर विश्वास ठेवा. येथे हिंसक जमावाने अनेक घरे, दुकाने आणि धार्मिक स्थळे जाळली आहेत. इंफाळमध्ये एका आमदारावरही हल्ला झाला. आतापर्यंत 9000 लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. सुरक्षा छावण्यांमध्ये नागरिकांना पाठवण्यात आलं आहे.

Manipur
Coal News: देशांतर्गत कोळसा उत्पादनात २३ टक्के वाढ, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले...

ब्रॉडबँड सेवाही बंद

मणिपूरमध्ये ब्रॉडबँड सेवाही बंद करण्यात आली आहे. हिंसाचार आणि अफवा पसरवण्यासाठी सरकारने रिलायन्स जिओ फायबर, एअरटेल एक्स्ट्रीम, बीएसएनएल इत्यादींना ब्रॉडबँड आणि डेटा सेवा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मणिपूर राज्यातील सध्याच्या परिस्थितीमुळे पुढील ५ दिवसांसाठी सेवा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com