Coal News: भारताच्या एकूण कोळसा उत्पादनात २३ टक्के वाढ झाली आहे.आर्थिक वर्ष २०१८-२०१९ मधील ७२८.७२ दशलक्ष टनाच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ८९३.०८ दशलक्ष टनापर्यंत वाढ नोंदवली गेल्याचं कोळसा मंत्रालयाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे. "कोळसा क्षेत्रासाठी आणि भारताच्या एकूण आर्थिक प्रगतीसाठी ही खूप चांगली बातमी आहे.", असं ते म्हणाले आहेत.
कोळशाला सर्व क्षेत्रातून असणाऱ्या मागणीची पूर्तता करण्यासाठी तसेच औष्णिक विद्युत केंद्रांमध्ये कोळशाचा पुरेसा साठा असावा याकरता आत्मनिर्भर आणि स्वयंपूर्ण होण्याच्या उद्देशाने देशांतर्गत कोळसा उप्तादन वाढवण्यासाठी कोळसा मंत्रालयाने अनेक उपाययोजना सुरु केल्या आहेत. (Latest Marathi News)
कोळसा उत्पादनातील या वृद्धीमुळे देशाला ऊर्जा सुरक्षा प्रदान करण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. आर्थिक वर्ष २०२३-२०२४ साठी निर्धारित वार्षिक कोळसा उत्पादनाचे उद्दिष्ट १०१२ दशलक्ष टन आहे.
याव्यतिरिक्त शाश्वत विकास उद्दीष्टे साध्य करण्यासाठी, कोळसा मंत्रालय, पर्यावरण सुरक्षा, साधनसंपत्तीचे संवर्धन, सामाजिक कल्याण तसेच आपली वने आणि जैवविविधता यांचे जतन करण्याच्या कार्यात सक्रियपणे सहभागी आहे.
खाणींमधील कोळशाची रस्ते वाहतूक टाळण्यासाठी एकात्मिक दृष्टीकोन विकसित करण्याकरता मंत्रालयाने धोरण तयार केले आहे आणि फर्स्ट माईल कनेक्टिव्हिटी (एफएमसी) प्रकल्पांतर्गत यांत्रिक कोळसा वाहतूक आणि लोडिंग सिस्टम अद्ययावत करण्यासाठी पावले उचलली आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.