लँड फॉर जॉब घोटाळा प्रकरणात लालूप्रसाद यादव यांच्यासह कुटुंबीयांवर आरोपनिश्चिती saam tv
देश विदेश

घोटाळा झाला! लालूप्रसाद यादवांचं अख्खं कुटुंब अडचणीत; राबडी, तेजस्वी, तेजप्रताप, मीसा भारतींसह ४६ जणांवर आरोपनिश्चिती

lalu yadav family land for job scam charges framed : दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टानं लालूप्रसाद यादव, राबडी देवी, तेजस्वी, मीसा भारती, हेमा आणि तेजप्रताप यादव यांच्यासह अन्य आरोपींविरुद्ध लँड फॉर जॉब घोटाळा प्रकरणात आरोप निश्चित केले आहेत. कोर्टानं ५२ आरोपींची निर्दोष सुटकाही केली.

Nandkumar Joshi

रेल्वेत कथित जमिनीच्या बदल्यात नोकरी देण्याच्या घोटाळा प्रकरणात लालूप्रसाद यादव यांच्यासह कुटुंबीयांच्या अडचणी वाढल्या आहेत. दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टाने शुक्रवारी सीबीआयच्या आरोपपत्रात लालूप्रसाद, तेजस्वी यादव, राबडी देवी, तेज प्रताप, मीसा भारती, हेमा यादव यांच्यासह ४६ जणांविरोधात आरोप निश्चिती केली आहे. कोर्टाने शुक्रवारी हा निर्णय दिला. तसेच कोर्टाने लँड फॉर जॉब घोटाळा प्रकरणात ५२ आरोपींची निर्दोष सुटकाही केली आहे.

लँड फॉर जॉब घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यांच्यासह कुटुंबीय आणि इतरांविरोधात पीसी अॅक्ट अंतर्गत आरोप निश्चित केले आहेत. आता लालूंसह कुटुंबीयांविरोधात खटला चालवण्यात येणार आहे. दिल्लीच्या कोर्टात शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान लालूप्रसाद आणि राबडी यांच्याव्यतिरिक्त अन्य सर्व आरोपी हजर होते. बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव आणि जेजेडी अध्यक्ष तेज प्रताप यादव देखील कोर्टात हजर झाले होते.

लालू प्रसाद यादव हे यूपीएच्या कार्यकाळात रेल्वे मंत्री असतानाचे हे प्रकरण आहे. रेल्वेमध्ये ग्रुप डीच्या पदांवर भरतीसाठी अनेक जणांकडून लालूप्रसाद यांच्या कुटुंबातील सदस्य तसेच इतर जवळच्या नातेवाईकांच्या नावावर कमी किंमतीत जमिनी खरेदी केल्या होत्या. सीबीआय या प्रकरणात चौकशी करत आहे. तर मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीकडे वेगळा तपास सुरू आहे.

१०३ पैकी ५२ आरोपींची सुटका

सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात एकूण १०३ जणांना आरोपी करण्यात आले होते. त्यातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. कोर्टाने शुक्रवारी निर्णय देताना ५२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. उर्वरित आरोपींवर आरोप निश्चिती केल्यानंतर त्यांच्याविरोधात आता खटला चालणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : दिवाळीला आपल्या घरची लक्ष्मी कमळावर होती, त्यामुळे जालन्याच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा ही कमळावर येणार आहे- चंदशेखर बावनकुळे

अजित पवारांच्या 6 बैठकांना दांडी; शहांच्या भेटीनंतर धनंजय मुंडे अन् CM फडणवीस एकाच व्यासपीठावर, चर्चांना उधाण

Contrast Colour Matching saree: कोणत्या रंगावर कोणता रंग सर्वात जास्त उठून दिसेल? सध्या 'या' 5 रंगांच्या जोड्या आहेत ट्रेडिंगमध्ये

Snehalata Vasaikar: गिरिजा ओकनंतर ही अभिनेत्री होतेय व्हायरल, सौंदर्याने केलं मार्केट जाम

Plane Crash : ओडिशात भयंकर विमान दुर्घटना, ९ जणांना घेऊन जाणारे प्लेन क्रॅश

SCROLL FOR NEXT