Ladli Behna Yojana Saam Tv News
देश विदेश

Ladli Behna Yojana : लाडकींसाठी खुशखबर! १५०० नंतर ३००० मिळणार, मुख्यंमंत्र्यांनी केली मोठी घोषणा; कधी मिळणार ३००० रुपये?

Ladli Behna Yojana : इंदूरमधील (Madhya Pradesh Government) लाडली बहणा योजनेबद्दल मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव म्हणाले की, दिवाळीच्या दिवशी लाडली बहणा योजनेची रक्कम १५०० रुपये केली जाईल.

Prashant Patil

इंदूर : मध्य प्रदेशातील लाडली बहना योजनेच्या (Ladli Behna Yojana) या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी गुरुवारी इंदूरमध्ये घोषणा केली की, त्यांचे सरकार जनतेला दिलेलं प्रत्येक वचन पूर्ण करेल. जाहीरनाम्यात लिहिलेल्या प्रत्येक गोष्टीची अंमलबजावणी केली जाईल. यावर्षी दिवाळीपासून लाडक्या बहिणींना १५०० रुपये दिले जातील. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की मध्य प्रदेश सरकार लाडली बहना योजनेची रक्कम ३००० रुपये करण्यासाठी वचनबद्ध आहे. २०२८ पर्यंत ही रक्कम ३००० रुपये केली जाईल.

इंदूरमधील (Madhya Pradesh Government) लाडली बहणा योजनेबद्दल मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव म्हणाले की, दिवाळीच्या दिवशी लाडली बहणा योजनेची रक्कम १५०० रुपये केली जाईल. २०२६च्या आर्थिक वर्षात ती पुन्हा वाढवली जाईल. २०२८ पर्यंत ही रक्कम ३००० रुपये केली जाईल. पुढे ते म्हणाले की, आम्ही पाच वर्षांत आमचा संकल्प पत्र पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहोत आणि २०२८च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आम्ही ते पूर्ण करू. १६ जून रोजी जबलपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी लाडली बहणा योजनेचा २५वा हप्ता महिलांच्या खात्यात हस्तांतरित केला. त्यांनी जबलपूरमध्ये अनेक विकासकामांची पायाभरणी आणि उद्घाटन देखील केले.

मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी काँग्रेसवर निशाणा साधला

यावेळी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, काँग्रेस नेत्यांनी विधाने करण्यापूर्वी विचार करावा. काँग्रेस सरला मिश्रा हत्याकांड का विसरली? काँग्रेसने फक्त लाचखोरीचे काम केले. त्यांचे अनेक नेते जामिनावर आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, हे भाजपचे सरकार आहे. आमच्या राज्यात जो कोणी कायदा मोडेल त्याला सोडले जाणार नाही. काँग्रेस नगरसेवक अन्वर कादरी यांच्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, तो दरोडेखोर असो किंवा दरोडेखोराचा बाप, कोणालाही सोडले जाणार नाही. त्यांनी प्रशासनाला अशा गुन्हेगारांना शोधून पकडण्याचे आणि कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

दरम्यान, मध्य प्रदेश सरकारने (Madhya Pradesh Government) या योजनेत महिलांना ३००० रुपये देण्याचे वचन दिले होते. त्या दृष्टीने आता सरकार पाऊल उचलत आहे. सरकारने सुरुवातीला १००० रुपये दिले होते. त्यानंतर हे पैसे पाठवून १२५० करण्यात आले आहे. त्यानंतर आता या योजनेचा निधी २५० रुपयांनी वाढवण्यात येणार आहे. सरकार रक्षाबंधनला महिलांच्या खात्यात अतिरिक्त २५० रुपये वाढवणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT