Andhra Pradesh Bus Fire Saam Tv
देश विदेश

Bus Fire: पुन्हा तीच काळरात्र! आगीच्या ज्वाळा अन् किंकाळ्या, गाढ झोपेतच २० प्रवाशांचा कोळसा; आगीचा गोळा कशी बनली बस?

Andhra Pradesh Bus Fire: आंध्रप्रदेशमध्ये बसला आग लागून भयंकर घटना घडली. धावत्या बसने दुचाकीला धडक दिली. त्यानंतर स्फोट होऊन बसने पेट घेतला. या आगीमध्ये २० जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले.

Priya More

Summary -

  • आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यात बसला भीषण आग

  • बसने दुचाकीला धडक दिली त्यानंतर लागली आग

  • आगीमध्ये २० प्रवाशांचा मृत्यू

  • पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू

आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे धावत्या खासगी बसला अचानक आग लागली. ही बस हैदराबादवरून बंगळुरूला जात होती. या घटनेमध्ये २० प्रवाशांचा जिवंत जळून मृत्यू झाला. दुचाकी आणि बसला सुरूवातीला अपघात झाला. या अपघातानंतर बसने पेट घेतला. बसला लागलेली आग इतकी भीषण होती की प्रवाशांना बसमधून बाहेर पडण्याची देखील संधी मिळाली नाही. काही प्रवाशांनी बसच्या काचा फोडून बाहेर उड्या मारल्या. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. तर अनेक प्रवाशांचा झोपेतच कोळसा झाला. या घटनेत अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्लूर मंडलमधील चिन्नाटेकुरु गावाजवळ हा अपघात झाला. हैदराबादवरून बंगळुरूला जाणाऱ्या खासगी बसने एका दुचाकीला धडक दिली. अपघातानंतर ही दुचाकी बसच्या खाली अडकली आणि त्यामध्ये मोठा स्फोट झाला. दुचाकीमध्ये स्फोट होऊन लगेचच बसला भीषण आग लागली. प्रत्यक्षदर्शींच्या मते, शुक्रवारी पहाटे ३ वाजता बस बंगळुरूकडे जात असताना हा अपघात झाला. अपघाताच्या वेळी परिसरात मुसळधार पाऊस पडत होता.

अपघातग्रस्त बसमध्ये अंदाजे ४० प्रवासी होते. दुचाकीचा स्फोट झाल्यानंतर काही क्षणातच बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. बसला आग लागल्याचे कळताच झोपेत असलेले प्रवासी जागे झाले. १२ प्रवासी आपत्कालीन मार्गाने आणि बसच्या खिडकीच्या काचा फोडून बाहेर पडले. स्थानिकांनी तात्काळ बचाव कार्य सुरू केले आणि पोलिसांना आणि अग्निशमन दलाला कळवले. अग्निशमन दल पोहोचेपर्यंत बस पूर्णपणे आगीत जळून खाक झाली होती.

या आगीमध्ये अनेक प्रवाशांच्या शरीराचा कोळसा झाला. मृतांची ओळख पटवणे देखील कठीण झाले. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामधील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. बसमधील बहुतेक प्रवासी हैदराबाद आणि बंगळुरू दरम्यान प्रवास करणारे स्थलांतरित कामगार होते. पोलिसांनी घटनास्थळ सील केले आहे आणि तपास सुरू केला आहे. चालक वेगाने बस चालवत होता आणि पावसामुळे दृश्यमानता कमी असल्याने त्याला समोरून येणारी दुचाकी दिसली नाही. त्यामुळे त्याने दुचाकीला धडक दिल्यानंतर बसला आग लागली, असा अंदाज वर्तवला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : कल्याणमध्ये पोलिसांकडून २ वर्षांच्या मुलीवर गंभीर गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण? Video

Chandrashekhar Bawankule : फोन टॅपिंगनंतर आता मोबाईल सर्व्हिलन्स? बावनकुळेंच्या वक्तव्याने राज्यात खळबळ, VIDEO

Saturday Horoscope : विनाकारण कामांमध्ये येणाऱ्या अडचणीमुळे मनोबल कमी होईल; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Maharashtra Government : राज्यात बांगलादेशी घुसखोरांना आळा बसणार; फडणवीस सरकारने उचललं मोठं पाऊल

Satara News : डॉक्टर महिलेचे आरोपीसोबत १५० हून अधिक कॉल, आत्महत्येपूर्वी काय घडलं? पोलीस तपासात महत्वाची माहिती समोर

SCROLL FOR NEXT