Who Is Kulwinder Kaur Saam TV
देश विदेश

Who Is Slapped Kangana: कंगना यांच्या थोबाडीत मारणारी कुलविंदर कौर कोण ?

Kulwinder Kaur Slapped Kangana Ranaut: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या चर्चेत आली आहे. कंगना रणौत मंडी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली असून ती आज दिल्लीला रवाना झाली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हिमाचलच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत विजयी झाल्या. भाजप खासदार कंगना या विजयी झाल्यानंतर चंदीगड विमानतळावर पोहोचल्या होत्या. या विमानतळावर कंगना यांना विमानतळावरील एका महिला CISF कॉन्स्टेबलने कानशिलात लगावल्याची घटना घडली. कुलविंदर कौर असं कंगाना यांना कानशिलात लगावणाऱ्या CISF कॉन्स्टेबलचं नाव आहे. कंगना यांना कानशिलात लगावणाऱ्या कुलविंदर कौरला निलंबित करण्यात आलं आहे. या कौर यांच्यावर विरोधात एफआयआर नोंद करण्यात आल्याची माहिती आहे.

चंदीगड विमानतळाची सुरक्षा पुरविणाऱ्या केंद्रीय सुरक्षा दलाने अर्थात सीआयएसएफने या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेशही दिले आहेत. कंगना रणौत यांनी दिल्लीत आल्यावर यांनी सोशल मीडिया एक्स प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ पोस्ट करत या घटनेची माहिती दिली.

कंगणा यांनी म्हटलं की, गुरुवारी विमानतळावर होते. मला शुभेच्छासाठी अनेक कॉल येत होते. मी विमानतळावरुन जात असताना CISF कॉन्स्टेबल कुलविंदर कौर माझ्या दिशेने आली. तिने माझ्या कानाखाली मारली. त्यानंतर मला शिवगाळ करु लागली. मी तिला विचारले की तिने असे का केले? त्यावर म्हणाली की, ती शेतकरी आंदोलनाचं समर्थन करते''.

''मी आता सुरक्षित आहे. पंजाबमध्ये असा हिंसाचार वाढताना दिसत आहे. आम्ही ते कसे हाताळायचं?''असं कंगना यांनी एक्सवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

सर्व घटनेवर कॉन्स्टेबल कुलविंदर कौर काय म्हणाली ?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये (Video) संतप्त झालेली कुलविंदर कौर या घटनेनंतर विमानतळावरील काही लोकांशी संवाद साधताना दिसून आली आहे. त्यात ती म्हणाली की, 'कंगना यांनी विधान केले की, शेतकरी दिल्लीत आंदोलन करत होते. कारण त्यांना त्यासाठी १०० रुपये किंवा २०० रुपये दिले गेले होते. मात्र त्यावेळी माझी आई आंदोलकांपैकी एक होती' असे कुलविंदर कौर व्हिडिओमध्ये बोलत आहे.

सीआयएसएफ कॉन्स्टेबल कुलविंदर कौर आहे तरी कोण?

१. साधारण २००९ कुलविंदर कौर CISF मध्ये सामील झाली. त्यानंतर २०२१ वर्षापासून ती चंदीगड विमानतळावर कार्यरत आहे.

२. कुलविंदर कौर ही पंजाबमधील सुलतानपूर लोधी येथील रहिवासी असून तिच्या कुटुंबियासोबत वास्तव्यास आहे.

३. ३५ वर्षीय कुलविंदर कौर गेल्या दोन वर्षापासून चंदिगड विमानतळावर कार्यरत आहे. तसेच कुलविंदरचा पतीही

सीआयएसएफमध्ये जवान आहे.

४. कुलविंदर कौरचा भाऊ हा एक शेतकरी नेता असून किसान मजदूर संघर्ष समितीचा संघटना सचिव आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: तासगावमध्ये शरद पवारांची सभा, अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेणार का?

Gold Price Today: 5000 हजारांनी स्वस्त झाल्यानंतर सोन्याचे भाव वाढले; 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

Devendra Fadanvis : मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, पाहा Video

Ladki Bahin Yojana : ... तर याला मी लाच म्हणेल, लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरे काय म्हणाले?

Praniti Shinde : भाजपचे आमदार फक्त जीआरवर, अस्तित्वात नाही; खासदार प्रणिती शिंदे यांची आमदार कल्याणशेट्टींवर टीका

SCROLL FOR NEXT