Kerala Woman Ends Life With Daughter Saam Tv News
देश विदेश

Shocking: नवऱ्याचं अफेअर, सासरा जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवायचा; चिमुरडीसह महिलेनं आयुष्य संपवलं

Dowry Tragedy: शारजाहमध्ये केरळमधील महिलेनं पोटच्या मुलीसह आत्महत्या केली. हुंडा, सौंदर्यावर जळण, मानसिक त्रास, आणि सासरच्या छळामुळे तिने हे टोकाचं पाऊल उचललं.

Bhagyashree Kamble

पुण्यात हुंडाबळीनंतर विविध राज्यातूनही हुंडाबळीचे प्रकार समोर येत आहेत. अशातच हुंडाबळीला कंटाळून केरळमधील महिलेनं आपल्या लेकीसह आत्महत्या केली आहे. सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी केलेल्या छळाला कंटाळून तिने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. पीडिता दिसायला सुंदर आणि रंग उजळ असल्यामुळे सासरच्या मंडळींनी तिचे केस कापले. तिला घटस्फोटाची नोटीसही पाठवण्यात आली होती. याच त्रासाला कंटाळून महिलेनं आयुष्य संपवलं. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी ३ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पीडित महिला केरळमधील कोल्लम कुंडारा पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी होती. ती आपल्या सासरच्या मंडळींसोबत राहत होती. मृत विवाहित महिलेच्या आईच्या तक्रारीनुसार, विरंजिका मणी (वय वर्ष ३२) असे मृत महिलेचे नाव आहे. ८ जुलै रोजी शारजाहमधील अल नहदा येथे आधी दीड वर्षीय पोटच्या चिमुकलीला संपवलं. नंतर स्वत: आत्महत्या केली. लग्नानंतर पीडित व्यक्तीच्या कुटुंबाने सासरच्या मंडळींना हुंडा दिला होता. मात्र, तेवढा हुंडा पुरेसा नव्हता. सासरची मंडळी आणखी हुंड्याची मागणी करीत होते.

तिच्या सौंदर्यावर जळत होते. यामुळे सासरच्या मंडळींकडून तिला वारंवार मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता. त्यांनी पीडित महिलेचे केस कापले. नंतर घटस्फोटाची नोटीसही पाठवली. यानंतर पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती तिला मिळाली. याचा जाब विचारले असता, पतीने तिला बेदम मारहाण केली. तिने आत्महत्या करण्यापूर्वी याबाबतची माहिती एका चिठ्ठीमध्ये लिहून ठेवली होती.

सासऱ्याकडूनही महिलेचा छळ केला जात होता. तिने चिठ्ठीत 'सासरा बेडवर अश्लील व्हिडिओ पाहायचा आणि मलाही ते व्हिडिओ पाहण्यासाठी दबाव टाकायचा. तसेच जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवायचा', असे तिने चिठ्ठीत नमूद केले आहे. याची माहिती पीडितेनं आपल्या पतीला माहिती दिली. मात्र, त्यानं 'वडिलांसाठी तुझ्याशी लग्न केलं' असं सांगितलं. तिने चिठ्ठीत सासरच्या मंडळींना शिक्षा झालीच पाहिजे, असा उल्लेख केला आहे.

यानंतर पीडितेच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पीडितेच्या आईनं दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी पती, नणंद, सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर पीडितेच्या आईने आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Death : काम करण्याची वेगळी आणि शिस्तबद्ध शैली होती; अजित पवारांच्या निधनानंतर प्रकाश आंबेडकरांची भावुक पोस्ट

अजितदादांच्या विमानाचं टेकऑफ ते अपघात...नेमकं काय घडलं ?

Ajit Pawar Death: अजित पवारांचे 'ते' ५ मोठे निर्णय; धडाडी निर्णयांनी बदलली महाराष्ट्राची अर्थव्यवस्था

नजर जाईल तिथपर्यंत कार्यकर्त्यांची अलोट गर्दी, अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी जमला जनसमुदाय|VIDEO

Thursday Horoscope : जुन्या चुकांमधून धडा घ्यावा लागेल; ५ राशींच्या लोकांना जपून निर्णय घ्यावे लागेल

SCROLL FOR NEXT