Crime News SaamTV
देश विदेश

Crime News : शेजार्‍याचे बायकोसोबत अफेअर, विजेचा शॉक देऊन नवऱ्यानं त्याचा जीव घेतला

Man Kills Neighbor with Electric Shock: शेजारच्या व्यक्तीसोबत पत्नीचे अवैध संबंध असल्याच्या संशयावरून पतीने शेजारी राहणार्‍या व्यक्तीला विजेचा शॉक देऊन हत्या केली आहे.

Bhagyashree Kamble

शेजारच्या व्यक्तीसोबत पत्नीचे अवैध संबंध असल्याच्या संशयावरून पतीने शेजारी राहणार्‍या व्यक्तीला विजेचा शॉक देऊन हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना केरळमधील अलाप्पुझा येथील पुन्नाप्रा गावात घडली आहे. या प्रकरणात आरोपी, त्याची मुलगी आणि पत्नीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरू आहे.

सोमवारी एकाच कुटुंबातील तीन सदस्यांना अटक करण्यात आली आहे. शेजारच्या व्यक्तीला विजेचा शॉक देऊन निर्घृण हत्या केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. किरण (२८), तिचे वडील कुंजुमन (५४) आणि आई अश्वम्मा (५०) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५३ वर्षीय दिनेशन यांचा मृतदेह ८ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६.३० वाजता त्यांच्या घराजवळील शेतात आढळला. कुंजुमन आणि किरण यांनी दिनेशनला मारण्यासाठी त्यांच्या घराच्या मागच्या रस्त्यावर विजेचा सापळा लावला होता. दिनेशनने त्यावर पाऊल ठेवताच विजेचा शॉक बसला. यानंतर दोघांनीही मृतदेह शेतात लपवून ठेवला.

पोलिसांनी सांगितले की, ही घटना ७ फेब्रुवारीच्या रात्री घडली. शवविच्छेदन तपासणीत मृत्यूचे कारण विजेचा शॉक लागून मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची चौकशी करत असताना दिनेशन आणि अश्वम्मा यांच्यातील संबंध उघडकीस आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण आणि तिचे वडील कुंजुमन यांना दिनेशन आणि अश्वम्मा यांच्यात अवैध संबंध असल्याची माहिती मिळाली. तेव्हा त्यांनी विरोध केला. दिनेशनला अश्वम्मापासून लांब राहण्यास सांगितले. पण दिनेशनने नकार दिला. यानंतर दिनेशन आणि किरण यांच्यात जोरदार भांडण झाले. किरणने तिच्या वडिलांसोबत मिळून हत्येचा कट रचला. विजेचा शॉक बसल्यामुळे दिनेशनचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथकाने चौकशी केली. चौकशीत संपूर्ण कट उघडकीस आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई, 22 लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त

Caramel Custard Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग, घरी बनवा रेस्टॉरंटस्टाईल क्रीमी कॅरॅमल कस्टर्ड, वाचा रेसिपी

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

SCROLL FOR NEXT