Sakshi Sunil Jadhav
हिंदू धर्मात दिवाळीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. दिवाळी सणाची सुरुवात धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरसपासून होते. या दिवशी भगवान धन्वंतरी, माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा केली जाते.
धनतेरसच्या दिवशी सोने, चांदी, नवीन भांडी आणि मौल्यवान वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. यंदा ६ नोव्हेंबर २०२६ रोजी धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे.
मात्र या दिवशी कोणालाही पैसे उधार देऊ नये, असे केल्यास असे केल्यास घरातील लक्ष्मी बाहेर जाते आणि आर्थिक अडचणी निर्माण होतात, असे मानले जाते.
या समजुतीमागचे नेमके कारण काय? तसेच धनत्रयोदशीला पैसे उधार देणे खरच अशुभ आहे का? याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.
धनत्रयोदशी कोणालाही पैसे उधार देणे किंवा दुसऱ्याकडून घेणे टाळावे. असे केल्याने घरातील लक्ष्मी बाहेर जाते. म्हणूनच अनेकजण या दिवशी पैसा घराबाहेर जाणार नाही, याची काळजी घेतली जाते.
धनत्रयोदशीच्या दिवशी यापूर्वी घेतलेले कर्ज परत करणे शुभ मानले जाते.
या दिवशी पैसे किंवा धन देणे अशुभ मानले जात असले तरीही काही परंपरांमध्ये गरजू व्यक्तींना अन्न, कपडे आणि जीवनावश्यक वस्तू देणे पुण्यकारक मानले जाते.
धनत्रयोदशीला पैसे तसेच मीठ, तेल, तूप, साखर, लोखंड, काच आणि धारदार वस्तूंचे दान किंवा देवाणघेवाण करणे टाळावे.
धनत्रयोदशीचा संबंध आर्थिक शिस्त, समाधान, आरोग्य आणि सहकार्यासोबतही जोडला आहे. त्यामुळे धार्मिक परंपरांचा आदर राखतानाच व्यवहारात समतोल राखणे गरजेचे आहे.