Norovirus Saam Tv
देश विदेश

Norovirus : कोरोनानंतर आता नोरोव्हायरचं संकट; केरळात २ मुलांना संसर्ग, ही आहेत लक्षणे

या विषाणूचे वेगवेगळे स्ट्रेन असल्यामुळे एखाद्याला या विषाणूचा अनेकदा संसर्ग होऊ शकतो.

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : एकीकडे देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे केरळमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. केरळमध्ये पुन्हा एका नवीन विषाणूने प्रशासनाची झोप उडवली आहे. नोरोव्हायरस (Norovirus) असं या व्हायरसचे नाव असून केरळमधील दोन मुलांमध्ये या विषाणूची लक्षणे आढळून आली आहेत. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी याला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की आरोग्य विभाग परिस्थितीचे आकलन करत आहे, काळजी करण्याची गरज नाही. मुलांची प्रकृती स्थिर आहे. (Kerala confirms cases of Norovirus infection)

नोरोव्हायरस हा एक अत्यंत संसर्गजन्य रोग आहे, जो सामान्यतः दूषित पाणी, दूषित अन्न आणि संक्रमित व्यक्तीच्या संपर्कातून पसरतो. केरळच्या तिरुवनंतपुरमच्या विहिंजममध्ये नोरोव्हायरसचा नवीन संसर्ग समोर आला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार या दोन मुलांव्यतिरिक्त इतर मुलांच्या चाचणीचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. शाळेत वाटप करण्यात आलेल्या मध्यान्ह भोजनातून या मुलांना विषबाधा झाल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहेत.

नोरोव्हायरसची लक्षणे काय?

नोरोव्हायरसच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये उलट्या आणि किंवा अतिसाराचा त्रास होतो. या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर एक किंवा दोन दिवसांनी हा त्रास सुरु होतो. रुग्णांना मळमळ, पोटदुखी, ताप, डोकेदुखी आणि अंगदुखीचाही त्रास होतो. अनेक प्रकरणांमध्ये द्रवपदार्थांचं सेवन कमी झाल्यामुळे डिहायड्रेशनचा त्रासही रुग्णांना होतो.हा विषाणू एखाद्या व्यक्तीला सतत बाधित करु शकतो. कारण त्याचे अनेक प्रकार आहेत.

नोरोव्हायरसचा संसर्ग कसा होतो?

नोरोव्हायरस हा फारच संसर्गजन्य आहे. मानवी विष्ठेचा अंश तोंडावाटे शरीरात गेल्यास या विषाणूचा प्राथमिक संसर्ग होतो. या विषाणूचे वेगवेगळे स्ट्रेन असल्यामुळे एखाद्याला या विषाणूचा अनेकदा संसर्ग होऊ शकतो. नोरोव्हायरस अनेक जंतुनाशकांना प्रतिरोधक आहे आणि ६० डिग्री सेल्सिअसपर्यंतच्या तापमानात हा विषाणू टिकून राहू शकतो. म्हणूनच फक्त वाफवलेले अन्न किंवा क्लोरीनच्या पाण्यामुळे हा विषाणू मरत नाही. हा विषाणू सामान्य हँड सॅनिटायझर्सच्या वापरानंतरही टिकून राहू शकतो.

नोरोव्हायरसपासून काय काळजी घ्यावी?

सहसा हा संसर्ग जीवघेणा नसतो, परंतु लहान मुले आणि वृद्धांना विशेषतः या संसर्गापासून सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. संसर्ग आणि अति उलट्या आणि जुलाबामुळे त्यांची स्थिती गंभीर होऊ शकते. बहुतेक रुग्ण काही दिवसात बरे होतात. या विषाणूने बळी पडलेल्या व्यक्तीला कोणतेही विशिष्ट औषध दिले जात नाही. हे टाळण्यासाठी, शौचालय वापरल्यानंतर किंवा डायपर बदलल्यानंतर आपले हात साबणाने वारंवार धुवा. जेवण करण्यापूर्वी किंवा अन्न तयार करण्यापूर्वी हात काळजीपूर्वक धुवावेत. गेल्या वर्षीही केरळमध्ये हा विषाणू पसरला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT