Manasvi Choudhary
आज श्रावणातील पहिला सण नागपंचमी आहे. नागपंचमीला नाग देवतेची पूजा केली जाते.
नाग पंचमीला नैवेद्यात पारंपारिक पद्धतीच्या पातोळ्या करा.
गावरान पद्धतीच्या पातोळ्या बनवायची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
पातोळ्या बनवण्यासाठी सर्वप्रथम गॅसवर कढईत एक कप पाणी गरम पाण्यात एक चमचा तूप आणि एक चिमूट मीठ घाला.
नंतर यामध्ये एक कप तांदळाचे पीठ घालून ते मिश्रण मिक्स करा. उकड पाच मिनिटे झाकून ठेवा.
गॅसवर कढईत दोन चमचे तूप घालून ते गरम झाल्यावर त्यात किसून घेतलेले खोबरे,गूळ व वेलची पावडर घालून सारण बनवून घ्या.
मग हळदीची पाने स्वच्छ धुवून आणि ती पुसून घ्या. नंतर उकडून घेतलेले पीठ चांगले मळून हळदिच्या पानावर लावा.
त्यावर सारण भरून ते पान चांगले दुमडून घ्या अश्या रीतीने सगळ्या पातोळ्या बनवून घ्या.
गॅसवर एका पातेल्यात पाणी घालून ते गरम झाल्यावर त्यात तयार पातोळ्या ठेवा.
पातोळ्या शिजल्या की त्यावर तूप घालून त्या सर्व्ह करण्यासाठी घ्या.