नवी दिल्ली: महाराष्ट्रासह देशातील कोरोना (Corona) रुग्णवाढीचा आलेख वाढताच आहे. कोरोनाचा धोका पुन्हा वाढला असून, चौथ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे जवळपास साडेचार हजार नवीन रुग्ण आढळले आहेत.
शनिवारच्या तुलनेत हा आकडा ५.८ टक्क्यांनी वाढला आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने सक्रिय रुग्णांची संख्याही २५ हजारांवर पोहोचली आहे. सक्रिय रुग्णांच्या संख्येत गेल्या २४ तासांत १७०० हून अधिकने वाढली आहे. (Omicron subvariant BA 4 and BA 5)
कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या वाढत असून, चिंताही वाढली आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, देशात जूनमध्ये कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव वाढण्यामागे ओमिक्रॉनचे उपप्रकार BA.4 आणि BA.5 असल्याचे सांगितले जात आहे. (Corona Virus Latest Marathi News)
महाराष्ट्रासह (Maharashtra Corona) देशातील अनेक भागांत BA. 4 आणि BA.5 चा संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहेत. तामिळनाडूमध्ये १२ नमुने घेण्यात आले होते. त्यातील दोन जण बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रातही मागील महिन्यात पुण्यात ४ रुग्ण बाधित झाले होते. ते यातून बरे झाले असल्याचे कळते. तामिळनाडूच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ४ जणांमध्ये BA.4 आणि BA.5 विषाणू आणि ८ जणांमध्ये BA.5 चा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत देशात महाराष्ट्र, तेलंगणा आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये या सब व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत.
ओमिक्रॉनचे सब-व्हेरियंट किती धोकादायक?
ओमिक्रॉनचे (Omicron) हे दोन्ही उपप्रकार BA.2 सारखेच आहेत. ओमिक्रॉनचा BA.2 व्हेरियंटमुळेच देशात कोरोनाची तिसरी लाट आली होती.
जागतिक आरोग्य संघटना (WHO) नुसार, BA.4 आणि BA. 5 या व्हेरियंटनं अद्याप गंभीर स्वरूप प्राप्त केलं नाही. मात्र, ओमिक्रॉनच्या अन्य उपप्रकारांच्या तुलनेत याचा संसर्ग वेगाने होतो.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, जगभरातील दहाहून अधिक देशांमध्ये BA.4 आणि BA. 5 चे बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांमध्ये वाढ होऊ शकते.
युरोपियन सेंटर फॉर डीसीज कंट्रोल आणि अमेरिकेच्या सेंटर फॉर डीसीज कंट्रोलने हे दोन्ही सबव्हेरियंट चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. अद्याप या सबव्हेरियंटमुळे गंभीर आजार झाल्याचे पुरावे आढळले नाहीत. मात्र, त्यांचा अन्य विषाणूंच्या तुलनेत अधिक वेगाने प्रादूर्भाव होतो.
ज्या देशांमध्ये ओमिक्रॉनच्या BA.2 व्हेरियंटमुळे नवी लाट आली होती, तिथे BA.4 आणि BA. 5 या व्हेरियंटचा परिणाम कमी प्रमाणात दिसून आलेला आहे.
कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरियंट हा गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेत आढळून आला होता. भारतासह जगातील अनेक देशांत या व्हेरियंटमुळे नवी कोरोना लाट आली होती. कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटच्या तुलनेत ओमिक्रॉन तितका घातक नाही. मात्र, त्याचा फैलाव वेगाने होतो.
ओमिक्रॉनचे आतापर्यंत अनेक सबव्हेरियंट असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरुवातीला BA.1 आणि BA. 2 व्हेरियंटचा प्रादूर्भाव दिसून आला होता. मात्र, आता BA.1.1, BA.3, BA.4 आणि BA. 5 या व्हेरियंटचे रुग्णही आढळून येत आहेत. BA.4 आणि BA. 5 या व्हेरियंटचा फैलाव BA.2 पेक्षा अधिक वेगाने होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका वाढला आहे, असे मानले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.