Kedarnath Opening And Closing Dates are Announced on Mahashivratri 2024 Saam TV
देश विदेश

Kedarnath Dham Open Date: शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी! 'या' दिवशी उघडणार केदारनाथ धामचे दरवाजे; महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर घोषणा

Kedarnath Dham Opening Date 2024: शंभू भक्तांसाठी सर्वात आनंदाची बातमी समोर आली आहे. १२ ज्योर्तिलिंगापैकी एक महत्वाचे धाम मानले जाणारे केदारनाथ मंदिराचे दरवाजे कधी उघडणार याबाबतची अधिकृत माहिती समोर आली आहे

Gangappa Pujari

Kedarnath Dham Doors Opening Date 2024:

आज देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे. अशातच शंभू भक्तांसाठी सर्वात आनंदाची बातमी समोर आली आहे. १२ ज्योर्तिलिंगापैकी एक महत्वाचे धाम मानले जाणारे केदारनाथ मंदिराचे दरवाजे कधी उघडणार याबाबतची अधिकृत माहिती समोर आली आहे. श्री केदारनाथ धामचे दरवाजे १० मे रोजी सकाळी ७ वाजता उघडतील, अशी महत्वाची घोषणा महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आली आहे.

केदारनाथ (Kedarnath) मंदिराचे दरवाजे उघडण्याची भाविक आतुरतेने वाट पाहत आहेत. आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे. यावर्षी १० मे रोजी शुभ मुहूर्तावर सकाळी ७ वाजता केदारनाथचे दरवाजे उघडतील. ओंकारेश्वर मंदिर उखीमठमध्ये आज ही घोषणा करण्यात आली आहे. उखीमठ येथील पंचकेदार गद्दी स्थळ श्री ओंकारेश्वर मंदिरात ५ मे रोजी भगवान केदारनाथांच्या पंचमुखी भोग मूर्तीचे पूजन करण्यात येणार आहे.

आज महाशिवरात्रीनिमित्त (Mahashivratri 2024) उखीमठ येथील पंचकेदार गड्डीस्थल श्री ओंकारेश्वर मंदिरात बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांच्या उपस्थितीत आयोजित धार्मिक कार्यक्रमात दरवाजे उघडण्याची तारीख निश्चित करण्यात आली. केदारधामचे दरवाजे आता उघडणार असल्याने त्याची जोरदार तयारी सध्या सुरू आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, केदारनाथला देशभरातून असंख्य भाविक दर्शनासाठी येत असतात. हिवाळ्यात प्रचंड बर्फवृष्टीमुळे सर्व मार्ग सहा महिने बंद करून केदारधामचा दरवाजा बंद केला होता. गतवर्षी 15 नोव्हेंबर 2023 च्या कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्ष द्वितीया, वृश्चिक राशी आणि ज्येष्ठ नक्षत्र या शुभ मुहूर्तावर सकाळी 8.30 वाजता दरवाजा बंद करण्यात आला होता. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pink Saree: नवविवाहीत स्त्रीयांनी श्रावणात सणासुदींसाठी नेसा 'ही' सुंदर गुलाबी साडी

Lonavala-Khandala Tourism: 'या' विकेंडला मस्त भिजायचंय? लोणावळा-खंडाळ्यातील 'या' धबधब्यांची नाव आताच नोट करा

Shefali Jariwala Property: शेफाली जरीवालाची एकूण संपत्ती किती? वारसदार कोण?

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sri Krishna Janmbhoomi Mathura: ईदगाह 'वादग्रस्त वास्तू' नाहीये; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT